Old death by snake bite | सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू

सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू

नाशिक : शेतातील घरात बसलेले असताना विषारी सर्पदंश झाल्याने निफाड तालुक्यातील अंतरवेली गावातील एका साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रामदास संभाजी दुनबळे असे मयत वृद्धाचे नाव आहे. दुनबळे मंगळवारी (दि.१८) गावातील मित्र वाळू महाले यांच्या शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास ते महाले यांच्या शेतातील घरात बसलेले असताना अचानक त्यांच्या उजव्या पायास विषारी सर्पाने दंश केला. ही बाब महाले यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्यांना तातडीने पिंपळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविले.
तेथून प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी वैद्यकीय सल्ल्याने दुनबळे यांना शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

Web Title: Old death by snake bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.