Ojhar was robbed of Rs 4 lakh along with gold jewelery | सोन्याच्या दागिन्यासह ४ लाखाचा ऐवज ओझरला घरफोडीत लंपास

सोन्याच्या दागिन्यासह ४ लाखाचा ऐवज ओझरला घरफोडीत लंपास

ठळक मुद्देघटना ओझर येथील लक्ष्मी नगर येथे घडली.

ओझरटाऊनशिप : बंगला बंद करून मुलगा आईसह आठ दिवसासाठी बाहेरगांवी गेले असल्याची संधी साधत चोरट्याने बंगल्याच्या सेफ्टीदरवाजासह मुख्यदरवाजाचा कोंडा तोडून दरवाजा उघडून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह ३ कँमेरे असा एकुण ३ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना ओझर येथील लक्ष्मी नगर येथे घडली.
अनंत सुरेश ढाके राहाणार प्लॉट नं. २४ श्री योगदान बंगला लक्ष्मी नगर ओझर हे आईसह (दि. १६ रात्री दहा वाजेला बंगला बंद करून आठ दिवसासाठी बाहेगांवी गेले असल्याची संधी साधत आज्ञात चोरट्याने बंगल्याच्या सेफ्टीदरवाजासह मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला व बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून कपाटातून साडे तिन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, साडे तिन तोळे वजनाची मंगळसूत्र पोत,दिड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, निकाँन कंपनीचा सायबर कॅमेरा, निकाँन कंपनीचा डिएसएलआर कॅमेरा व एक अँपल कंपनीचे मनगटी घड्याळ असा एकूण ३ लाख ९० हजार रूपये किमतीचा ?वज चोरून नेला तसेच बँक लाँकर चाव्या व कारच्या चाव्या ही चोरून नेल्याचे काल दिनांक २७ रोजी सांयकाळी गांवावरून परत आल्या नंतर ढाके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चोरी झाल्याची तक्र ार ओझर पोलीस ठाण्यात नोंदविल्यावरून ओझर पोलीसांनी चोरट्याविरु द्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय कवडे हे करीत आहेत.
(२८ ओझर १)

Web Title: Ojhar was robbed of Rs 4 lakh along with gold jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.