ओझर वायुसेना स्टेशनला राजभाषा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:49 IST2020-11-27T00:48:36+5:302020-11-27T00:49:22+5:30
ओझर येथील वायुसेना स्टेशनला २०१९-२०चे राजभाषा प्रभावी कार्यान्वयनकरिता नगर राजभाषा कार्यान्वयन समिती नाशिकद्वारा राजभाषा शिल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ओझरच्या वायुसेना स्टेशनच्या वार्षिक हिंदी पत्रिका ‘कायाकल्प’चे प्रकाशन करताना एयर कमोडोर पी. एस. सरीन, मुख्य प्रशासनिक अधिकारी ग्रुप कॅप्टन एस. अय्यर व संपादक मंडळ.
नाशिक : ओझर येथील वायुसेना स्टेशनला २०१९-२०चे राजभाषा प्रभावी कार्यान्वयनकरिता नगर राजभाषा कार्यान्वयन समिती नाशिकद्वारा राजभाषा शिल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समितीद्वारा डेपोची वार्षिक हिंदी पत्रिका ‘कायाकल्प’ लाही सर्वोत्कृष्ट वार्षिक हिंदी पत्रिकेचा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. वायुसेना स्टेशनचे एयर कमोडोर पी. एस. सरीन यांनी डेपोतील सर्व कर्मचाऱ्यांनी राजभाषामधून केलेल्या कार्याची प्रशंसा केली व यापुढेही आपले कार्यालयीन कार्य राजभाषे मधूनच करावे यासाठी प्रोत्साहित केले.