एक अधिकारी रुजू, दोघांचे बदलीसाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:17 IST2018-06-12T01:17:15+5:302018-06-12T01:17:15+5:30

महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी एक अधिकारी दाखल होत असतानाच, दोन अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी शासनाला विनंती केल्याचे वृत्त आहे.

 An official, the application for transfer of both | एक अधिकारी रुजू, दोघांचे बदलीसाठी अर्ज

एक अधिकारी रुजू, दोघांचे बदलीसाठी अर्ज

नाशिक : महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी एक अधिकारी दाखल होत असतानाच, दोन अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी शासनाला विनंती केल्याचे वृत्त आहे.  अधिकाऱ्यांवर कामाचा ताण तसेच कामचुकारांवर होणाºया कारवाया यामुळे महापालिका सर्वत्र गाजत आहे. त्यातच स्थानिक स्तरावर बदल्या होत असतानाच आता परसेवेतील अधिकाºयांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात फेरबदल होऊ लागले आहेत. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी महापालिकेच्या सेवेतून विनंती बदली मागितल्याने त्यांची मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या ऐवजी सुहास शिंदे हे नवी मुंबई महापालिकेतून दाखल झाले आहेत. नाशिकचे महापालिकेचे मुख्य लेखापाल पद हे उपसंचालक दर्जाचे असतानादेखील त्यांना रुजू करून घेण्यात आले आहे. दुसरीकडे, एक अधिकारी दाखल होत असताना दुसºया दोन अधिकाºयांनी मात्र शासकीय सेवेत जाण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार यांनी यासंदर्भात अर्ज केले आहेत. दोन्ही अधिकाºयांना यापूर्वी आॅनलाइन तक्रारींचे वेळेत निराकरण न झाल्याने नोटिसादेखील बजावण्यात आल्या होत्या.

Web Title:  An official, the application for transfer of both