पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:54 IST2019-10-01T01:54:07+5:302019-10-01T01:54:33+5:30

मेनरोडवरील पूर्व विभाग मनपा कार्यालयाचा काही भाग ढासळल्याने कर्मचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने कार्यालय पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यास अखेर प्रारंभ झाला असून, येत्या आठ दिवसात अनेक विभागांचे कामकाज पंडित कॉलनीत सुरु होणार आहे.

 The offices of the Eastern Division began to migrate | पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास सुरु वात

पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास सुरु वात

इंदिरानगर : मेनरोडवरील पूर्व विभाग मनपा कार्यालयाचा काही भाग ढासळल्याने कर्मचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने कार्यालय पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यास अखेर प्रारंभ झाला असून, येत्या आठ दिवसात अनेक विभागांचे कामकाज पंडित कॉलनीत सुरु होणार आहे.
सदर कार्यालय स्थलांतर करण्याबाबत अनेकदा चर्चा झाली. मात्र निर्णय लांबणीवर जात असल्याने लोकमतने देखील यावर प्रकाशझोत टाकला होता. अखेर पूर्व विभागाचे कार्यालय पंडित कॉलनीतील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यास मुहूर्त लागला असून, सोमवारी एका विभागाचे दप्तर पंडित कॉलनीत स्थलांतरीत करण्यात आले.
सोमवारी विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांनी इमारतीतील जुन्या शिक्षण विभागाची पाहणी केली. या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत स्थलांतराला सुरुवात केली. येत्या शुक्रवारपर्यंत येथील पूर्व विभागातील सभापती कार्यालय यांसह सर्व विभागांचे कामकाज याठिकाणाहून सुरू होणार आहे.

Web Title:  The offices of the Eastern Division began to migrate