निरूपयोगी माठ द्या, वृक्षसंपदा जगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:50 PM2020-04-01T22:50:09+5:302020-04-01T22:50:49+5:30

उन्हाळ्याची चाहूल लागली असून, आपल्याप्रमाणेच वृक्षांना पाण्याची गरज आहे. उपयोगात नसलेली मातीची मडकी आम्हाला दान करा. झाडांना पाणी देण्यासाठी त्याचा वापरु, असे आवाहन वृक्षप्रेमी गोरख जाधव यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. गत २० वर्षांत शेकडो झाडांची लागवड करून त्यांना जगवणारे गोरख जाधव तालुक्यात सुपरिचित आहेत.

Offer worthless land, live on trees! | निरूपयोगी माठ द्या, वृक्षसंपदा जगवा!

वृक्षरोपण करताना डॉ. रोहन बोरसे, गोरख जाधव आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देउपक्रम : दोन दशकात शेकडो वृक्षांची लागवड

नांदगाव : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, आपल्याप्रमाणेच वृक्षांना पाण्याची गरज आहे. उपयोगात नसलेली मातीची मडकी आम्हाला दान करा. झाडांना पाणी देण्यासाठी त्याचा वापरु, असे आवाहन वृक्षप्रेमी गोरख जाधव यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. गत २० वर्षांत शेकडो झाडांची लागवड करून त्यांना जगवणारे गोरख जाधव तालुक्यात सुपरिचित आहेत.
उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी वापरण्यात येणारी मडकी, माठ, रांजण, केळी वापरून नवीन मडकी घेतली जातात. जुन्या मडक्यांना घरात स्थान राहात नाही. त्यामुळे ती अडगळीत पडतात. अशी मडकी झाडे जगवण्यासाठी द्या, असे आवाहन गोरख जाधव यांनी केले आहे. त्यात ते पाणी भरु न झाडांच्या बुडाजवळ ठेवत असतात. या वर्षी त्यांनी सुमारे १२५ लहानमोठे माठ जमवून पाणी भरु न झाडांच्या बुंध्यापाशी ठेवले आहेत. त्यांच्या पत्नी मीना या कामात बरोबरीने त्यांना साथ देत असतात. मागील दुष्काळात झाडे वाचवण्यासाठी बुंध्याला मातीची भर घालण्याचा उपक्र म केला होता. सदैव वृक्षाच्या सान्निध्यात राहणारे जाधव हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधरी ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीचे उपक्र म राबविले आहेत. मागील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने घरपोहोच वृक्ष देऊन लागवड केली आहे.

Web Title: Offer worthless land, live on trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.