‘रामायण’समोर फटाके फोडणाऱ्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:59 IST2018-11-24T00:59:19+5:302018-11-24T00:59:44+5:30
महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाºया अज्ञात व्यक्तींविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात नव्हे, तर महापौर रंजना भानसी यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘आम्ही नाशिककर’ या संस्थेतर्फे पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़

रामायण बंगल्यासमोर फटाके फोडून न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाºया महापौर व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांना देताना ‘आम्ही नाशिककर’ या संघटनेचे सदस्य़
नाशिक : महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाºया अज्ञात व्यक्तींविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात नव्हे, तर महापौर रंजना भानसी यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘आम्ही नाशिककर’ या संस्थेतर्फे पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची दि. २२ नोव्हेंबरला बदली करण्यात आल्याचे आदेश सरकारने काढले़ यानंतर महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला़ सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या कालावधितच फटाके फोडण्यास परवानगी दिलेली आहे़ मात्र, महापौर रंजना भानसी व त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांनी दुपारी १२ ते १ या कालावधित फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व कायद्याचा भंग करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे़
फटाके फोडल्याची बातमी सर्वदूर पसरल्याने सर्वसामान्यही या कायद्याचे उल्लंघन करतील़ कायदा व सुव्यवस्थेसाठी तसेच कायदा हा सर्वांना समान आहे़ त्यामुळे महापौरांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे़ या निवेदनावर समाधान भारतीय, अनिल भडांगे, विनायक येवले, जगबिर सिंग, योगेश कापसे, सुमित शर्मा यांच्या सह्या आहेत़
कुणीच कसे आढळले नाहीत?
दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रवींद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते पीटर मोबाइलने गस्त घालीत असताना महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडण्याचा आवाज आला़ त्यानुसार संबंधित ठिकाणी पोहोचून संशयितांचा शोध घेतला असता फटाके फोडणारे कोणीही आढळून आले नाहीत़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान कलम १८८, २८६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (१) (यू) १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़