मनमाड : शीख धर्मीयांचे संस्थापक संत गुरु नानक यांची ५५० वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती.सातनाम वाहेगुरूंचा जयघोष करीत निघालेल्या या नगर कीर्तन यात्रेत पंचप्यारे, पंचनिशाण तसेच सुशोभित चित्ररथात गुरू ग्रंथ साहेब तर दुसऱ्या चित्ररथात शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच अश्वधारी शीख बांधवांसह देशभरातून आलेले शीख बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते.जयंतीनिमित्त शीख धर्मियांच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. गुरु द्वारा येथे मंगळवारपासून धार्मिक कार्यक्र म सुरू होते. यात प्रामुख्याने प्रवचन, किर्तन असे कार्यक्र म होते. तर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी सर्व धर्मसमभाव म्हणून शहरातील सर्व धर्माचे धर्मगुरू यांना बोलावून त्यांचा गुरु द्वारा प्रबंधक रणजितसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वधर्म यावर व्याख्यान दिले. शहरातील सर्व धर्मीय बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरु नानक जयंती निमित्त मनमाडला धार्मिक कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:21 IST
मनमाड : शीख धर्मीयांचे संस्थापक संत गुरु नानक यांची ५५० वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती.
गुरु नानक जयंती निमित्त मनमाडला धार्मिक कार्यक्र म
ठळक मुद्देचित्ररथात शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.