पेरणीपूर्व शेतकामांना लॉकडाउनचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:13 PM2020-05-23T21:13:26+5:302020-05-24T00:28:28+5:30

दाभाडी : महाराष्ट्रात साधारणत: दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होेते. त्यामुळे मे महिन्यात बळीराजाकडून शेतकामांना व पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिला जातो; मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आल्याने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाउन सुरू आहे. हा लॉकडाउन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मोठा अडसर ठरत आहे.

 Obstacles of pre-sowing lockdown to farmers | पेरणीपूर्व शेतकामांना लॉकडाउनचा अडसर

पेरणीपूर्व शेतकामांना लॉकडाउनचा अडसर

Next

दाभाडी : महाराष्ट्रात साधारणत: दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होेते. त्यामुळे मे महिन्यात बळीराजाकडून शेतकामांना व पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिला जातो; मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आल्याने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाउन सुरू आहे. हा लॉकडाउन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मोठा अडसर ठरत आहे.
जमिनीची नांगरणी करणे, मशागत करणे, गवत काढणे, बांध घालणे अशा अनेक कामांची पूर्वतयारी करूनच पेरणी करावी लागते. ही कामे पूर्ण असल्यास पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणी करणे सोपे जाते, मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना कुटुंबीयांसोबतच कामे करावे लागत आहे. मात्र हे काम मजुरांशिवाय शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण राहिली आहेत
ट्रॅक्टर व यंत्रांच्या साहाय्याने नांगरणी व मशागत होत असली तरी या यंत्रसामग्रीला लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध होत नसल्याने आणि लॉकडाउनमुळे सर्वत्र दुकाने बंद असल्याने यंत्रही बंद अवस्थेत आहेत. त्यातच पिकाला बाजारभाव नसल्याने दोन महिन्यांपासून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागणारा खर्च कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी चिंतित आहे.
-------
कोरोनामुळे डाळिंंब, द्राक्ष यांसारख्या फळबागांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला तर अक्षरश: सडून खराब झाला आहे. मका, कापूस यांसारख्या पिकांना बाजारात मागणी नाही व योग्य दर मिळत नसल्याने तो तसाच पडून आहे. दरम्यान बाजार समित्या बंद होत्या. आजही किरकोळ बाजारही बंद आहेत. अशा प्रकारच्या अनेक संकटांनी वेढलेल्या बळीराजाला खरीप पिकाच्या पेरणीसाठी शासनाकडून योग्य मदत व्हावी, अशी मागणी कसमादे परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  Obstacles of pre-sowing lockdown to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक