न्यायडोंगरी आदिवासी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 23:59 IST2021-08-09T23:49:31+5:302021-08-09T23:59:36+5:30
न्यायडोंगरी : येथील श्री शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित आदिवासी आश्रमशाळेत सोमवारी (दि. ९) जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.

आदिवासी आश्रम शाळेत कोविड लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी समवेत सुशिला आहिरे आदी उपस्थित होते.
ठळक मुद्दे प्रमुख अतिथी म्हणून न्यायडोंगरी ग्रामपालिकेच्या सरपंच सुशिला अहिरे उपस्थित
न्यायडोंगरी : येथील श्री शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित आदिवासी आश्रमशाळेत सोमवारी (दि. ९) जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून न्यायडोंगरी ग्रामपालिकेच्या सरपंच सुशिला अहिरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर संस्थेचे सरचिटणीस ॲड. अनिल आहेर यांनी मार्गदर्शन केले.