‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’ स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 06:55 PM2019-06-19T18:55:00+5:302019-06-19T18:56:20+5:30

नाशिक : कायझेनच्या अंमलबजावणीनंतर उत्पादकता, दर्जा, मूल्य, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे मनोबल या बाबींवर सकारात्मक बदल होतो व त्यातून ...

nsk,start,of,nima,kozen,competition | ‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’ स्पर्धेला प्रारंभ

‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’ स्पर्धेला प्रारंभ

googlenewsNext

नाशिक : कायझेनच्या अंमलबजावणीनंतर उत्पादकता, दर्जा, मूल्य, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे मनोबल या बाबींवर सकारात्मक बदल होतो व त्यातून उत्पादन खर्चात कपात, उत्पादनात व उत्पादनप्रक्रि येत परिणामकारकता साध्य करणे शक्य होते, असे प्रतिपादन उत्पादन सल्लागार विनोद मानवी यांनी केले.
निमात आयोजित ‘निमा कायझेन स्पर्धा २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कायझेन कुणी करावे, मूल्यमापन कसे करावे, मूल्यमापनाच्या पद्धती, उत्पादन प्रक्रि येच्या कोणत्या टप्प्यात करावे याबाबत उपस्थिताना माहिती दिली. कायझेनचे वर्गीकरण स्पष्ट करताना ९० टक्के कायझेन्स हे सुधारात्मक प्रकारचे कायझेन्स असतात, अशी माहिती त्यांनी दिली. नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक यावी व अस्तित्वात असलेल्या उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. बदलत्या काळानुसार अस्तित्वातील उद्योगांना व्यवसाय वाढीसाठी उत्पादनात व उत्पादनप्रक्रि येत सुधारणा करणे आवश्यक ठरते. त्यासाठी कायझेन स्पर्धांसारखे उपक्र म महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास निमा इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक मंगेश पाटणकर यांनी केले. स्वागत भाग्यश्री शिर्केयांनी केले. सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी निमाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी प्रामुख्याने ३० विविध प्रकारचे कायझेन सादर करण्यात आले. निमाच्या आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी निमा कायझेन स्पर्धा २०१९ चे नियम, रजिस्ट्रेशन प्रक्रि या व पारितोषिकांचे स्वरूप स्पष्ट केले.

Web Title: nsk,start,of,nima,kozen,competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.