इगतपुरी वगळता जिल्ह्यात पावसाची दडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:17 IST2019-07-15T15:15:32+5:302019-07-15T15:17:38+5:30
नाशिक : जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची ...

इगतपुरी वगळता जिल्ह्यात पावसाची दडी
नाशिक: जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुके कोरडे असल्याने पुरेशा पेरण्या देखील होऊ शकल्या नसल्याने शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात केवळ ५०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसºया आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने पावसाने जोर धरला, असे वाटत होते. मध्यंतरही शहरासह काही तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले होते. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी ५० टक्केच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात रद्द होण्याची देखील चर्चा सुरू झाली होती. परंतू आता पावसानेच दडी दिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण दिसत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत ३५ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ८ मि.मी इतक्याच पावसाची नोंद झाली.