शाळा बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 18:31 IST2018-11-02T18:29:42+5:302018-11-02T18:31:56+5:30

शिक्षणसंस्था चालकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दिलेल्या शाळा बंद हाकेला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने सर्वत्र सुरळीत परीक्षा पार पडल्या. दरम्यान, बंद ८० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

nsk,composite,response,school,closed,district | शाळा बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

शाळा बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

ठळक मुद्देपरीक्षांचा परिणाम : नियाजनाअभावी वेळ चुकल्याची चर्चा

नाशिक: शिक्षणसंस्था चालकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दिलेल्या शाळा बंद हाकेला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने सर्वत्र सुरळीत परीक्षा पार पडल्या. दरम्यान, बंद ८० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
सन २०१२ पासून शासनाने शिक्षक भरतीवर आणलेले निर्बंध, नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न आणि अशैक्षणिक कामांचा ताण वाढल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शुक्रवार दि. २ रोजी राज्यभरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यात खासगी शिक्षण संस्थाचालकांकडून शैक्षणिक संस्था चालविल्या जात असून हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून संस्थाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षक भरती, अशैक्षणिक कामे आणि शिक्षकेतर अनुदानाचा मुद्या महत्वाचा असून यावर धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षणसंस्था शासनाशी लढा देत अ ाहेत.
याच अनुषंगाने महाराष्टÑ राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने २ नोव्हेबर रोजी शाळा बंदची हाक लिदी होती. त्यानुसार जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्राथमिक शाळांना यापूर्वीच सुट्या लागल्या असून माध्यमिक विभागाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार पार पडल्या. असे असतांना संस्थाचालकांनी मात्र बंद ८० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

Web Title: nsk,composite,response,school,closed,district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.