सुरक्षित वीजेसाठी महावितरणची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:54 IST2019-01-16T16:44:46+5:302019-01-16T16:54:15+5:30
नाशिक : महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राकडून सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाता ...

सुरक्षित वीजेसाठी महावितरणची जनजागृती
नाशिक: महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राकडून सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाता पथनाट्ये रॅली, चर्चासत्र, बॅनर आणि पत्रकांच्या माद्यमातून शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांमध्ये विजेचा सुरिक्षत वापर व वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी यासंदर्भात जनजागृती करण्याती करण्यात येणार आहे.
मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व प्रशिक्षण विभागाकडून सुरक्षा सप्ताहातील प्रबोधनात्मक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक बिरू जाडकर आणि विद्युत निरीक्षक हेमंत गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण केंद्रात सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्र मांचे उदघाटन करण्यात आले. प्रशिक्षण केंद्रापासून निघालेल्या रॅलीचा एकलहरे येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पथनाट्य व प्रात्यिक्षकांचा माध्यमातून समारोप झाला.
विद्युत संच मांडणी सुरिक्षत ठेवण्यासाठी घ्यावयाची दक्षता, विजेची उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, लिफ्ट संदर्भातचे नियम व गुणवत्तेबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. वीज अपघात प्रसंगी घाव्याची काळजी व प्रथोमचाराबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंते अभिमन्यू चव्हाण, देवेंद्र सायनेकर, अनिल नागरे यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, विध्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. नथनाट्य व प्रात्यिक्षकांमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंते तसेच संदीप फाऊंडेशन व मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
सप्ताहानिमित्त वीज क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व त्यांच्याकडे काम करणारे कामगार व पर्यवेक्षक यांच्यासह अधिकाधिक ग्राहकांमध्ये वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य महाव्यवस्थापक जाडकर यांनी यावेळी दिली. विद्युत सुरक्षा या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा, व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आल्याचे जाडकर यांनी कळविले आहे.