आता तुम्हीच करा तुमच्या मतदार यादीत दुरूस्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 02:22 PM2019-12-14T14:22:46+5:302019-12-14T14:22:56+5:30

पेठ - मतदार यादीत असलेल्या चुका व त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांची होणारी तारांबळ लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभेच्या निवडणूकीनंतर मतदार यादींच्या पडताळणीची विशेष मोहीम हाती घेतली असून आता मतदारांसाठी स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

 Now you just have to repair your electoral rolls! | आता तुम्हीच करा तुमच्या मतदार यादीत दुरूस्ती !

आता तुम्हीच करा तुमच्या मतदार यादीत दुरूस्ती !

Next

पेठ - मतदार यादीत असलेल्या चुका व त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांची होणारी तारांबळ लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभेच्या निवडणूकीनंतर मतदार यादींच्या पडताळणीची विशेष मोहीम हाती घेतली असून आता मतदारांसाठी स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ ) यांच्या माध्यमातून १ जानेवारी २०२० ही अर्हता दिनांक गृहीत धरून प्रत्येक कुंटूबातील मतदारांची या मोहीमेव्दारे पडताळणी करण्यात येणार आहे. मतदाराच्या नाव, वय, लिंग, पत्ता व छायाचित्रात झालेल्या चुकांची दुरु स्ती करण्यात येणार असून मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांबाबतही मतदारांचा अभिप्राय संकलित करण्यात येणार आहे. पेठ तालुक्यात ९३ मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना तज्ञ मार्गदर्शक आर.डी. शिंदे यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी तहसीलदार संदिप भोसले, निवडणूक नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांचे सह बीएलओ, अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. (१४ पेठ १)
---------------------------
मतदारांसाठी अ‍ॅपची निर्मिती
निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी वोटर हेल्पलाईन नावाचे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून या अ‍ॅपव्दारे मतदार आपल्या मतदार यादीतील माहीती तपासून त्याबाबतची दुरु स्ती आवश्यक कागदपत्र अपलोड करून आयोगाकडे सादर करू शकणार आहे.आयोगाकडून दुरु स्तीची खातरजमा करून प्रमाणित करण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे अ‍ॅप बीएलआसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदार यादीत समाविष्ठ मतदारांच्या तपशीलाची दुरु स्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title:  Now you just have to repair your electoral rolls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक