शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आता निविदाही न्यायाधिकरणात

By admin | Updated: September 27, 2014 00:06 IST

राखेच्या विटा : महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

नाशिक : इमारत बांधकामासाठी लाल विटांऐवजी राखेच्या विटा वापरण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आता महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसे स्पष्ट आदेश या न्यायाधिकरणाने दिले आहेत.एकलहरा येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा वापर व्हावा यासाठी नाशिक फ्लाय अ‍ॅश ब्रिक्स असोसिएशनचे सुनील मेंढेकर यांनी पुणे येथील उच्च न्यायालयात दोन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल विटा तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मातीचा होणारा बेसुमार वापर, वीटभट्टीमुळे होणारे वायुप्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने बांधकामात राखेच्या विटांचा वापर करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. बांधकामात काही प्रमाणात अशा विटांचा वापर करता येऊ शकणार असला, तरी राखेची निर्मिती असलेल्या क्षेत्राच्या शंभर किलोमीटर परिघात मात्र कोणत्याही बांधकामात राखेच्याच विटा वापरल्या जाव्या असे केंद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाचे आदेश आहेत; परंतु त्याचा भंग होत असल्याचा आरोप हरित न्यायाधिकरणात करण्यात आला होता. त्यानंतर हरित न्यायाधिकरणाने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला अशा प्रकारे राखेच्या विटांचा वापर सक्तीचा केला; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने न्यायाधिकरणाचा अवमान होत असल्याची याचिका असोसिएशनने ती महिन्यांपूर्वी दाखल केली आहे. त्याला अनुसरून झालेल्या सुनावणीत हरित न्यायाधिकरणाने हे आदेश दिले आहेत. निविदांच्या अटींमध्ये राखेच्या वापर सक्तीचा केल्याची अट आहे किंवा नाही याची पडताळणी न्यायाधिकरण करणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी काम पाहिले. पुढिल सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)