आता भाऊच नाहीतर बहीण देखील रक्षा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:16+5:302021-08-28T04:18:16+5:30
पिंपळगाव बसवंत : बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन भावाकडून घेते; मात्र आता भावनेचा बहिणीला स्वरक्षणाचे धडे देत ...

आता भाऊच नाहीतर बहीण देखील रक्षा करणार
पिंपळगाव बसवंत : बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन भावाकडून घेते; मात्र आता भावनेचा बहिणीला स्वरक्षणाचे धडे देत तिला सक्षम बनवले आहे.आता ती स्वतःचे नाही तर समाजातील इतर भगिनीचेही रक्षण करण्यासाठी तिने कंबर कसली आहे
पिंपळगाव बसवंत येथील मास्टर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्टच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन साजरा केला व आपल्या भावांना राख्या बांधून त्यांच्या रक्षणाचे वचन दिले.आता भाऊच नाही तर बहीण देखील रक्षण करण्यासाठी सज्ज होत असल्याचे संदेश यावेळी या विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी मार्शल आर्टचे संचालक योगेश जठार,मोसम मणियार,योगेश देशमुख व विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन होय. रक्षाबंधनाच्या दिवशी आपली लाडकी बहीण आपल्या छोट्या किंवा मोठ्या भावाच्या कपाळावर तिलक कुंकू लावून त्याच्या मनगटावर सुंदर अशी राखी बांधते व भावाला मनोभावे ओवाळते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो; मात्र आता बहीणही अबला न राहता सबला होण्यासाठी जुडो,कराटे,तालीम ,कुस्ती याचे धडे घेत स्वतःला स्वाभिमानी करत आहेत आणि ती स्वतःचेच नाही तर आपल्या भावाचे रक्षण करु शकते असे संदेश देत आहे. (२७ पिंपळगाव २)
270821\27nsk_16_27082021_13.jpg
२७ पिंपळगाव २