शिक्षण समितीत आता नऊ सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:58 IST2018-08-25T00:57:17+5:302018-08-25T00:58:19+5:30
महापालिकेत शिक्षण मंडळ आणण्याचे सत्तारूढ भाजपाचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता शिक्षण समितीची निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून, नगरसचिव विभागाने त्यासंदर्भात महापौरांना पत्र दिले आहे. तथापि, ही समिती म्हणजे विशेष समिती असल्याने नऊच सदस्यांना संधी मिळणार आहे.

शिक्षण समितीत आता नऊ सदस्य
नाशिक : महापालिकेत शिक्षण मंडळ आणण्याचे सत्तारूढ भाजपाचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता शिक्षण समितीची निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून, नगरसचिव विभागाने त्यासंदर्भात महापौरांना पत्र दिले आहे. तथापि, ही समिती म्हणजे विशेष समिती असल्याने नऊच सदस्यांना संधी मिळणार आहे, याशिवाय वृक्ष प्राधिकरण समितीवर नगरसेवक सदस्यांच्या नियुक्तीसाठीही पुढील महिन्यातच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होत असल्याने नाराजांना चुचकारण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण समितीला हात घालण्यात आला आहे. नगरसचिवांनी यासंदर्भात महापौरांना पत्र दिले असून त्यानुसार नऊ सदस्यांसाठी निवडणूक जाहीर करण्याची सूचना केली आहे. पुढील महिन्यात निवडप्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.