शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

...आता ‘मायक्रोव्हेव’ करणार बायोवेस्ट निर्जंतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:26 IST

प्लॅस्टिक कचरा ही शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी गंभीर समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे न कुजणारे प्लॅस्टिक जणू मनुष्याची जीवनशैली बनत चालला आहे. प्लॅस्टिकच्या जैविक कचऱ्यावर मात करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चक्क ‘मायक्रोव्हेव डिसइन्फेक्टर’ राज्यात प्रथमच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बसविला आहे.

ठळक मुद्दे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रयत्न । राज्यात पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा रुग्णालयात सुरू

नाशिक : प्लॅस्टिक कचरा ही शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी गंभीर समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे न कुजणारे प्लॅस्टिक जणू मनुष्याची जीवनशैली बनत चालला आहे. प्लॅस्टिकच्या जैविक कचऱ्यावर मात करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चक्क ‘मायक्रोव्हेव डिसइन्फेक्टर’ राज्यात प्रथमच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बसविला आहे. यामुळे रुग्णालयात निघणाºया जैव वैद्यकीय प्लॅस्टिक कचºयाच्या समस्येवर सहज मात करून त्याचा पुनर्वापरही करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयावर दिवसेंदिवस जिल्ह्यातील रुग्णांचा मोठा ताण वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारादरम्यान निघणारे प्लॅस्टिक जैव वैद्यकीय कचºयाची समस्याही गंभीर रूप धारण करत असताना जिल्हा रुग्णालय प्रशासनाला या कचºयाचे नेमके करायचे काय? असा प्रश्न पडत होता.या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने वरील सर्व प्लॅस्टिकचे वैद्यकीय साहित्य वापरानंतर या यंत्रात टाकून एका विशिष्ट तापमानापर्यंत तापविले जाणार आहे. त्यामुळे त्यामधील जिवाणू, विषाणू नष्ट होऊन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कारखान्याला पाठविता येतील. या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण तर होण्यास मदत होईलच, मात्र शासनाला महसूलदेखील मिळेल, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केला. या यंत्राचे अनावरण मंडळाचे सदस्य सचिव र्ई. रविंद्रन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सुपाते, विभागीय अधिकारी डॉ. जे. बी. संगेवार आदी उपस्थित होते.जिल्हा रुग्णालयाची यंत्रणाही होतेय ‘स्मार्ट’रुग्णालयात वापरादरम्यान निघणाºया प्लॅस्टिकच्या सुईविरहित सिरिंज, सलाइन बाटल्या, नळ्या, कॅथेटर्स, आयव्ही सेट, हातमोजे, मूत्रपिशव्या, व्हॅक्युट्युनर्स यांसारख्या वस्तूंना पुन्हा वापरात आणण्याजोगे करण्याचे काम हे यंत्र करणार आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा जैववैद्यकीय कचरा आता कमी होण्यास मदत होईल. या इको-फ्रेण्डली यंत्रामुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. स्मार्ट सिटी होत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयदेखील कात टाकत असून ‘स्मार्ट’ आरोग्यसेवा पुरविण्यास प्रयत्नशील असल्याचे जगदाळे म्हणाले.दररोज १५ बादल्या कचरादररोज दहा ते पंधरा मोठ्या बादल्या भरून सिरिंज, सलाइन, कॅथेटर्स यांसारखा कचरा साचत होता. या कचºयाची विल्हेवाट लावताना प्रशासनाच्या नाकीनव येत होते. त्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. महामंडळाने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जिल्हा शासकीय रुग्णालयाला ‘मायक्रोव्हेव डिसइन्फेक्टर’ भेट दिला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यenvironmentपर्यावरण