शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

आता नाशिकमध्ये नाटक बंद! : प्रशांत दामले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:14 AM

: कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

नाशिक : कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. नाट्यगृह खरे तर कमाईचे साधन नसते ती शहराची गरज असते. परंतु आता त्याला पर्याय काय, असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.  शहराचा सांस्कृतिक आणि विशेषत: नाट्य चळवळीला पूरक असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे भाडे पाचपट वाढविण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही उद्विग्न भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. कालिदास कलामंदिराची दुरवस्था झाल्यानंतर नाटके सादर करणाऱ्या आणि कलावंतांना होणाºया त्रासाबद्दल प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली होती. त्यामुळे महापालिका खडबडून जागी झाली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पात महाकवी कालिदास कलामंदिराचा विषय समाविष्ट करून त्याचे रूपडे पालटले. परंतु आता महापालिकेने त्याचे दर वाढविले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली.नाट्यगृहे ही शहराची गरज असते. कालिदास कलामंदिराचे स्वरूप महापालिकेने पालटले असून त्याविषयी आनंद आहे. त्यासाठी प्रयत्न करणाºया आयुक्तांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. परंतु आता कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करताना त्याकडे कमाईचे साधन म्हणून बघितले जात असेल तर त्यावर काय बोलणार, असा प्रश्न दामले यांनी केला. मुंबई- पुण्यातदेखील नाट्यगृहे आहेत. त्यांचे दरदेखील एकवीस हजार नाही. पुण्यातील नाट्यगृहाचे भाडे बारा हजार रुपये आहे. त्या नाट्यगृहाची अवस्था चांगली नाही ते जुने झाले असे म्हटले तर कालिदासदेखील कधी ना कधी जुनेच होणार आहे. मग त्याचे भाडे कमी करणार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये कालिदास कलामंदिराला दुसरा पर्याय नाही आणि एकमेव पर्यायाचे भाडे वाढले असेल तर आता नाशकात नाटके करणे बंद करावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Prashant Damleप्रशांत दामलेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका