शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ३२४ गाळेधारकांना बजावल्या नोटिसा

By admin | Updated: October 25, 2016 01:09 IST

सुनावणी : पोटभाडेकरूसंबंधी विचारला जाब

नाशिक : १३ जून २०१६ रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मालकीच्या १९७३ गाळ्यांबाबत अचानक राबविलेल्या सर्वेक्षणात विविध स्वरूपात त्रुटी आढळून आलेल्या ३२४ गाळेधारकांना मनपाने नोटिसा बजावल्या असून, त्याबाबतची सुनावणी सुरू झाली आहे. सोमवारी (दि.२४) नाशिक पश्चिम विभागातील १०३ पैकी ९० गाळेधारकांनी हजेरी लावत उपआयुक्तांपुढे आपले म्हणणे मांडले. मंगळवारी अन्य पाचही विभागांतील गाळेधारकांची सुनावणी होणार आहे. महापालिकेची एकूण ५८ व्यापारी संकुले असून, त्यात १९७३ गाळे आहेत. मनपाचे गाळे पोटभाडेकरूंना देण्यात येऊन कमाई केली जात असल्याचे तसेच काही गाळे परस्पर विक्री करण्याचेही प्रकार घडले असल्याचे आरोप स्थायी समिती व महासभेवरही सदस्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जून महिन्यात मनपाच्या संपूर्ण गाळ्यांची अचानक तपासणी केली होती. या मोहिमेची कमालीची गुप्तता पाळली गेली होती. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी गाळेधारकावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांच्याकडून माहिती संकलित केली होती. गाळ्यामध्ये जो कुणी उपलब्ध असेल त्याला ‘गाळा कुणाचा’ हा प्रश्न विचारला गेला होता. त्यापाठोपाठ एक विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेतानाच व्हॅट, सेल्सटॅक्स रजिस्ट्रेशन, शॉप अ‍ॅक्ट लायसेन, विद्युत देयके व त्यावरील मूळ गाळेधारकाचे नाव आदि माहिती संकलित करण्यात आली होती. शिवाय सोबत दुकानाच्या फलकापासून ते ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलबुकापर्यंतचे छायाचित्रण व चित्रीकरण करण्यात आले होते. अचानक झालेल्या या झाडाझडतीमुळे पोटभाडेकरू असलेल्या व्यावसायिकांची भंबेरी उडाली, तर काहींनी शटर डाउन करत पळ काढला होता. दरम्यान, गेडाम यांची बदली झाल्यानंतर या सर्वेक्षण अहवालावर कारवाई होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती,