शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात लाल फुली हीच नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:59 AM

सिडको विभागात ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात महापालिकेने रेखांकन सुरू केल्याने सिडकोकरांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी (दि.२३) सिडकोतील नागरिकांसह काही नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना कारवाईपूर्वी नोटिसा देण्याची विनंती केली; परंतु वाढीव बांधकामांवर केलेली लाल फुली हीच नोटीस असल्याचे सांगत आयुक्तांनी ३१ मे पूर्वी प्रस्ताव सादर करत बांधकामे नियमितीकरणाचा सल्ला संबंधितांना दिला.

नाशिक : सिडको विभागात ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे पाडून टाकण्यासंदर्भात महापालिकेने रेखांकन सुरू केल्याने सिडकोकरांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी (दि.२३) सिडकोतील नागरिकांसह काही नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना कारवाईपूर्वी नोटिसा देण्याची विनंती केली; परंतु वाढीव बांधकामांवर केलेली लाल फुली हीच नोटीस असल्याचे सांगत आयुक्तांनी ३१ मे पूर्वी प्रस्ताव सादर करत बांधकामे नियमितीकरणाचा सल्ला संबंधितांना दिला. दरम्यान, आयुक्त ३१ मेनंतर कारवाईवर ठाम असल्याने आता सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.  मागील शनिवारी (दि.१९) सिडकोत झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात आयुक्त मुंढे यांनी एका तक्रारीवर बोलताना सिडकोतील ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर झालेली वाढीव बांधकामे काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून महापालिकेमार्फत अनधिकृत बांधकामांचे मार्किंग करण्याचे काम सुरू झाले आहे. या मार्किंगला नागरिकांकडून विरोधही दर्शविला जात आहे. दरम्यान, बुधवारी (दि.२३) सिडकोतील काही नागरिकांसह नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी आयुक्तांची भेट घेऊन कारवाई थांबविण्यासाठी निवेदने दिली. त्यात, काही नागरिकांनी सिडकोत कारवाई करण्यापूर्वी संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात याव्यात, अशी मागणी आयुक्तांकडे केली. परंतु, नोटिसांची गरज नसल्याचे सांगत आयुक्तांनी बांधकामांवर केलेल्या लाल फुल्या याच नोटिसा समजा, असे सांगत कारवाईबाबत आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले.३१ मे २०१८ पर्यंत शासनाच्या धोरणानुसार कम्पाउण्डिंग चार्जेस भरून बांधकामे नियमित करून घ्यावीत, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही आयुक्तांनी नागरिकांना केली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर आणि भागवत आरोटे यांनीही आयुक्तांची भेट घेऊन सिडकोतील बांधकामे नियमित करण्याची मागणी करत कारवाई न करण्याची विनंती केली. राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष वैभव देवरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन सामान्य नागरिकांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, आयुक्तांनी या शिष्टमंडळलाही कारवाई होणारच, असा इशारा दिला. त्यामुळे निवेदने देऊन परतलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली. त्यातूनच या कारवाईविरोधात सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी चालविली आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी सिडकोतील वाढीव बांधकामे नियमित करावी, लिज होल्डवरील घरे फ्री होल्ड करावी आणि जाचक हस्तांतरण शुल्क रद्द करावे, अशी मागणी थेट शासनाकडे केली आहे.फोटो काढण्यास मनाईसिडकोतील नागरिकांसह काही नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी आयुक्तांना निवेदने दिली आणि त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना निवेदने देतानाचा फोटो काढण्यास आयुक्तांनी मनाई केली. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे यांचा बोलता बोलता आवाज वाढल्याने आयुक्तांनी त्यांना कमी आवाजात बोला, असे सुनावले. त्यामुळे आरोटे व आयुक्तांत शाब्दिक वादही झाले. याचबरोबर नगरसेवक दिलीप दातीर यांनी भंगार बाजार दोनदा उठवूनही तिसºयांदा पुन्हा बसल्याचे सांगत आयुक्तांचे त्याकडे लक्ष वेधले. त्यावेळी आयुक्तांनी कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका