शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

पालिकेचा पाय खोलात : माफीनाफ्याच्या नामुष्कीनंतर माजी महापौरांना नोटीस ‘ग्रीनफिल्ड’वर पुन्हा कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:37 IST

नाशिक : अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देनाचक्कीनंतर दोन-अडीच तासांतच महापालिकेकडून या नोटिसा तोडलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधून देण्याची ग्वाही

नाशिक : आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत स्थगिती आदेश असतानाही पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयात महापालिका आयुक्तांवर माफी मागण्याची नामुष्की ओढवल्यानंतर काही तासांतच महापालिकेच्या अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २५) उच्च न्यायालयात झालेल्या नाचक्कीनंतर दोन-अडीच तासांतच महापालिकेकडून या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.महापालिकेने मते यांच्या मालकीच्या ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही पाडून टाकण्याची कारवाई केली होती. त्यावर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयासमोर आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफी मागावी लागली होती आणि तोडलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधून देण्याची ग्वाही द्यावी लागली होती. या प्रकरणामुळे महापालिकेची मोठी नाचक्की झाली. त्यातून महापालिकेच्या एकूणच चाललेल्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. शुक्रवारी उच्च न्यायालयाने दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपला आदेश दिला आणि त्यानंतर दोन-अडीच तासांनी माजी महापौर प्रकाश मते यांच्या हाती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रिटेंनिग वॉलबद्दलची नोटीस पडली शिवाय, नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ४० लाख रुपये जमा करण्याचेही आदेशित करण्यात आले.माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीची केनिंगस्टन क्लबची जागा चांदशी शिवारात आहे. गोदावरी नदीलगत जाणाऱ्या शिवरस्त्याशेजारी क्लबची रिटेनिंग वॉल आहे. सदर आरसीसी रिटेनिंग वॉल ही महापालिकेने नदीलगत बांधलेल्या गॅबियन वॉलवर पडून तिचे नुकसान झाल्याचा दावा महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नोटिशीत केला आहे. नदीपात्रात सदर रिटेनिंगचा मलबा पडून गोदापात्रातील प्रवाहमार्गात अडथळा निर्माण झाला आहे. सदर आपत्तीमुळे नदीपात्रालगतच्या जीविताला व मालमत्तांना धोका पोहोचण्याची संभावना निर्माण झाली आहे.सदर अडथळा चोवीस तासांत काढून घ्यावा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. याचबरोबर तातडीने दुसरी नोटीस बजावतानाही नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ४० लाख रुपये भरण्याचे आदेशित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात फटकारे बसल्यानंतर काही तासांतच महापालिकेने नोटिसा पाठविण्याची कार्यवाही केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.