सटाणा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिसा

By Admin | Updated: August 23, 2015 22:29 IST2015-08-23T22:28:54+5:302015-08-23T22:29:26+5:30

सटाणा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिसा

Notice to cast unauthorized construction at Satana | सटाणा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिसा

सटाणा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिसा


सटाणा: शहरातील मालेगाव रोड वरील मोक्याच्या ठिकाणचा सर्व्हे नंबर ३८१/१ चा भूखंड गैरव्यवहार प्रकरणी पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे बांधलेले बांधकाम एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करावे अन्यथा प्रशासनातर्फे फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी बजावल्याने प्लॉटधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
शहरातील मालेगाव रोडवरील या भूखंडाच्या नऊ हजार तीनशे चौरस मीटर क्षेत्राचे निवासासाठी ‘’एन ए ‘’करण्यात आले होते .मात्र संबंधित भूखंडधारकाने अटी शर्तींचे पालन नकरता तसेच नगर रचना विभागाकडून लेआऊटला अंतिम मंजुरी नसतांना तलाठ्याला हाताशी धरून प्लॉटचे सात/बारा उतारे तयार करण्यात आले .त्यानंतर बेकायदेशीरपणे त्याचा खरेदी-विक्र ीचा व्यवहार करण्यात आल्याचे उघडकीस आले.या गैरव्यवहारला माहिती अधिकार कार्यकर्ता विजय भांगिडया यांनी वाचा फोडली
होती.
दरम्यान या अनिधकृत लेआऊटवरील सुमारे आठ प्लॉटवर बांधकाम केल्याचे आढळून आल्याने याबाबत पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अन्वये संबंधित प्लॉटधारकांना नुकतीच नोटीस बजावली आहे.
बेकायदेशीरपणे केलेले बांधकाम एक महिन्याच्या आत जमीन दोस्त करावे अन्यथा अन्यथा संबंधित प्लॉटधारकाविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई करून त्याच्या खर्चास व परिणामास जबाबदार राहतील असेही या नोटिसीत नमूद केल्याने
एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Notice to cast unauthorized construction at Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.