शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

३६ हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:29 AM

पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून धडक कारवाईचा इशारा ‘त्या’ मिळकतधारकांना दिला आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विभाग : सुमारे ४५ कोटींची थकबाकी; प्रशासनाची कारवाई

नाशिक : पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून धडक कारवाईचा इशारा ‘त्या’ मिळकतधारकांना दिला आहे.महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाला नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुमारे ६० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिल्याने पाणीपुरवठा विभाग खडबडून जागे झाले आहे. यामुळे पाणीपुरवठा प्रशासनाने धडक कारवाई राबविण्याची तयारी केली आहे. या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरात पाणीपट्टीची रक्कम थकविणाऱ्यांचा आकडा ३६ हजारांच्या घरात आहे. यामुळे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान निर्माण झााले आहे. मागील अनेक वर्षांपासून मिळकतधारकांकडे थकबाकी असून, पाणीपुरवठा विभागाने याकडे कधीही गंभीर्याने लक्ष दिले नाही. आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करावयाचे असल्याने आता मात्र या विभागाची धावपळ होत आहे. मागील ३३ कोटी आणि चालू देयकापोटी १२ कोटी अशी एकूण ४५ कोटींची थकबाकीची रक्कम आहे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी एप्रिलपासून अद्याप २७ कोटींची पाणीपट्टी वसूल करण्यास विभागाला यश आले आहे. उर्वरित ३५ कोटी साडेतीन महिन्यांत वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. बहुतांश थकबाकीदारांकडून नोटिसांकडे गांभीर्याने बघितले जात नसल्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यामुुळे थकबाकीची रक्कम वसूल होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सहाही विभागांना आदेशपाणीपुरवठा विभागाकडून पूर्व, पश्चिम, नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी अशा सहाही विभागांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सहाही विभागांमधील मिळून सुमारे ३६ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. यात पाच हजारांहून अधिक यामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम थकलेल्या थकबाकीदारांचा समावेश आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर देयकावरील थकीत रक्कम अदा न केल्यास संबंधितांना कुठलीही पूर्वसूचना न देता नळजोडणी तोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील अधिकृत नळजोडणीचा आकडा सुमारे १ लाख ९३ हजार इतका आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर