शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:33 AM

सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपंडित पोहनकर : अभिजात संगीताचा वारसा जोपासण्याची गरज

नाशिक : सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.गेली सहा दशके गायन क्षेत्रात योगदान देणाऱ्या पंडितजींनी मंगळवारी (दि.१०) शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर नाशिकमध्ये मुक्काम केला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी अनेक विषयांवर मुक्त संवाद साधला. वयाच्या नवव्या वर्षी मोठ्या गायकांसमोर गाणाºया पंडितजींचे त्यावेळी केवळ कौतुकच झाले नाही तर इतक्या लहान वयात त्यांनी आदर प्राप्त केला. त्यांची संगीत सेवा अव्याहत सुरूच आहे.देशाला शास्त्रीय गायकीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे या गायकीच्या वारसा दीर्घकाळ टिकणारच असे खात्रीलायक सांगणाºया पंडितजींनी नवीन पिढीत काही चांगले गायक, संगीतकार आहेत, त्यांना काही ना काही करावेसे वाटते ही चांगली बाब आहे. राहुल देशपांडे, राकेश चौरसिया अशी अनेकांची नावे घेता येतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. नवीन पिढीची वाटचाल चांगली सुरू आहे, असे सांगताना त्यांनी चॅनल्सवरील रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली चालणाºया अनेक गायनाचे कार्यक्रम वास्तविक वाटत नाही. अनेकदा जज देखील संयुक्तिक नसतात. कलावंतांना त्यांच्या गायकीपेक्षा मोेठे करताना असे स्पर्धक गायक लोकप्रिय होतात; मात्र लोकप्रियतेचे निकष वेगळे असतात. लोकप्रिय होणे म्हणजे गायनाचा दर्जा असतोच असे नाही त्यामुळे लोकप्रियतेपेक्षा गायनाच्या दर्जावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.संगीत शिक्षण देणाºया संस्था वाढल्या आहेत. परफॉर्मिंग आर्ट्सची कॉलेजेस वाढत आहेत; परंतु त्यातून किती जण पुढे येतात किंवा तग धरू शकतात हा महत्त्वाचा भाग आहे. नव्या पिढीत खूप टॅलेंट आहे; परंतु तो पीआर किंवा लोकप्रियतेशी जोडला जातो, ते टाळले पाहिजे असेही पंडितजी म्हणाले.तर ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा...४रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायकांना गाणे म्हटल्यानंतर एसएमएससाठी प्रेक्षकांना आवाहन करावे लागते. येणाºया एसएमएसवर निकाल ठरविला जातो, हा प्रकार खटकणारा असल्याचे सांगतानाच पंडित पोहनकर यांनी एसएमएससाठी स्पर्धकांनी आवाहन करण्यापेक्षा ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक