शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात नाही, पण विजयोत्सवात सामील

By admin | Updated: May 17, 2014 00:31 IST

नाशिक : नाशिक लोकसभेसाठीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी महायुतीत असतानाही शिवसेना-भाजपा पदाधिकार्‍यांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या कारणास्तव महायुतीच्या विरोधात काम करण्याचा इशारा देणारे रिपाइंचे पदाधिकारी हेमंत गोडसे विजयी होताच त्यांच्या विजयोत्सवात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नाशिक : नाशिक लोकसभेसाठीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी महायुतीत असतानाही शिवसेना-भाजपा पदाधिकार्‍यांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या कारणास्तव महायुतीच्या विरोधात काम करण्याचा इशारा देणारे रिपाइंचे पदाधिकारी हेमंत गोडसे विजयी होताच त्यांच्या विजयोत्सवात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये रिपाइं (आठवले गट) सामील झाल्यानंतर महायुतीचे स्वरूप आले होते. त्यानंतर निवडणुकीपूर्वी राज्यभर महायुतीचे मेळावे झाले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे हेमंत गोडसे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सारे पक्ष झाडून कामाला लागले होते. असे असतानाही रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी प्रचारात दिसून आले नव्हते. भाजपाचा कार्यकर्ता मेळावा झाला त्यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते; परंतु रिपाइंच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रण नव्हते. तसेच मतदारसंघातही प्रचारादरम्यान रिपाइंच्या कार्यकर्त्यांना सामील न करण्यात आल्याने मतदानाच्या दोनदिवस आधी रिपाइंच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा-शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आणि रिपाइंच्या पदाधिकार्‍यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याबद्दल महायुतीचा विचार करण्याचा इशाराच देत प्रचारात सामील झाले नव्हते. एवढेच नाही, तर महायुतीच्या प्रचाराच्या रॅलीमध्येही रिपाइं कार्यकर्ते अन् त्यांचे ध्वज दिसले नव्हते. दरम्यान, आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी होताच त्यांच्या स्वागताच्या छोटेखानी मिरवणुकीमध्ये भगव्या ध्वजाबरोबरच रिपाइंचे निळे ध्वजही मानाने फडकत होते. एवढेच नाही, तर रिपाइंचे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर हे विजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर विराजमान झाल्याने काही शिवसैनिकांच्या भुवया मात्र उंचावल्या.