उत्तर आफ्रिकेचा ‘शाम कादंब’ नांदूरमधमेश्वरमध्ये

By Admin | Updated: November 21, 2014 23:50 IST2014-11-21T23:49:21+5:302014-11-21T23:50:09+5:30

हंसाचा मूळ वंश : तीन वर्षांनंतर प्रथमच घडले दर्शन, दोन जोड्या दाखल; सैबेरियन ‘कोरल’चेही आगमन

North African 'evening kadamba' in Nanduram | उत्तर आफ्रिकेचा ‘शाम कादंब’ नांदूरमधमेश्वरमध्ये

उत्तर आफ्रिकेचा ‘शाम कादंब’ नांदूरमधमेश्वरमध्ये

अझहर शेख ल्ल नाशिक
परदेशी स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखला जाणारा उत्तर आफ्रिका व मध्य आशिया खंडातील ‘शाम कादंब’ (ग्रे लॅग गूस) हा पक्षी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात क्वचित आढळतो. गेल्या तीन वर्षांपूर्वी या जातीच्या दोन पक्ष्यांनी पाणथळ जागेतील उंचवट्यावर पक्षी निरीक्षकांना दर्शन दिले होते. त्यानंतर प्रथमच या पक्ष्याच्या दोन जोड्या सकाळी क्रमांक तीनच्या उंचवट्यावर आढळून आल्या. सैबेरियन पक्षी ‘कोरल’ (युरेशिएन कर लिव्हू) या पक्ष्याचेही दोन वर्षांनंतर पुन्हा आगमन झाले आहे.
नांदूरमधमेश्वरला आॅक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत २४० हून अधिक जातीचे देशी-परदेशी स्थलांतरित पक्षी आढळून येतात. दरवर्षी भरणाऱ्या देशी-विदेशी पक्षी संमेलनाचे आगळे वैशिष्ट्य असते. यावर्षी देशी-विदेशी बदकांचे विविध प्रकार मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहे. चित्र बलाक (पेंटेड स्ट्रोक), उघड्या चोचीचा बलाक (ओपन बिल स्ट्रोक), पांढऱ्या मानेचा करकोचा, छोटा शराटी (ग्लॉसी आयबीज), काळा शराटी (ब्लॅक आयबीज), पांढरा शराटी, चमचा बगळा (स्पूनबील), मोठा करकोचा (कॉमन क्रेन), राखी बगळा (ग्रे हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), वंचक (पॉण्ड हेरॉन), दलदल ससाणा (मार्श हॅरियर), कापशी घार, देवससाणा (कॉमन किस्ट्रल), मॉँटेग्यू ससाणा (मॉन्टेग्यू हॅरियर), छोटा गरुड, सर्प गरुड, बहिरी ससाणा (पियरग्राईन फाल्कन) हे पक्षी मोठ्या संख्येने अभयारण्यात दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: North African 'evening kadamba' in Nanduram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.