येवल्यात नगरपालिके तर्फे नालेसफाई मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 18:46 IST2020-06-21T18:44:39+5:302020-06-21T18:46:31+5:30

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता तसेच पावसाळापूर्व नालेसफाई मोहीम येवला नगरपरिषदेने हाती घेतली आहे.

Non-cleaning campaign by the municipality in Yeola | येवल्यात नगरपालिके तर्फे नालेसफाई मोहीम

येवल्यात नगरपालिके तर्फे नालेसफाई मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता तसेच पावसाळापूर्व नालेसफाई मोहीम येवला नगरपरिषदेने हाती घेतली आहे.
शहरातील संपूर्ण १२ वार्डात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून लक्कडकोट भागातून सदर मोहिमेचा प्रारंभ झाला.
याप्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, आरोग्य सभापती शेख परवीन निसार, नगरसेवक पुष्पा गायकवाड, मुख्यधिकारी संगिता नांदुरकर, स्वच्छता विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने स्वच्छता कर्मचाऱ्यांची पथके तयार केली असून शहरातील सर्व वार्डात सर्र्वेक्षण करून रिकाम्या जागा तेथील झुडपे, कचरा गोळा करण्यात येत आहे. शहरात बारा प्रभागातील गल्ली बोळात जंतूनाशक औषधांची फवारणी केली जाणार असून नाल्याचे दुतर्फा असलेली काटेरी झाडे झुडपे काढून नाल्याची स्वच्छता देखील करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नांदूरकर यांनी सांगितले.

Web Title: Non-cleaning campaign by the municipality in Yeola