शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

आता प्रभाग समित्यांवर नेमणार अशासकीय सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:52 AM

महापालिकेच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून टाळाटाळ हात होती. मात्र आता लोकसभा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहाही प्रभाग समित्यावर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी कार्यवाही सुरू झाली असून, नगरसचिव विभागाने विभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.

नाशिक : महापालिकेच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून टाळाटाळ हात होती. मात्र आता लोकसभा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहाही प्रभाग समित्यावर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी कार्यवाही सुरू झाली असून, नगरसचिव विभागाने विभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.दरम्यान, महापालिकेच्या वतीने ही कार्यवाही सुरू असली तरी सध्या विभागीय अधिकारी आणि अन्य अधिकाºयांच्या अधिकारात वाढ करण्यात आल्याने कोणत्याही समितीवर प्रशासकीय मंजुरीचे विषयच नसल्याने अगोदरच नगरसेवक त्रस्त असताना अशासकीय सदस्य नियुक्त करून काय उपयोग असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य शासनाने प्रभाग समित्यांचे गठन केल्यानंतर नाशिक महापालिकेत १९९७ मध्ये प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली. त्यानंतर सहा विभागातील सर्व प्रभागातील संबंधित प्रभागांचा त्यात समावेश करण्यात आला. या समित्यांमध्ये नगरसेवक सदस्य तेच पदसिद्ध असतात. केवळ दरवर्षी अध्यक्षपदाचीच निवडणूक होत असते. दरम्यान, पहिल्या वेळेपासूनच प्रभाग समित्यांवर तज्ज्ञ अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी महापालिकेने त्यात फार लक्ष घातले नव्हते. राजकीय पक्षांनीदेखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले.दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली त्यावेळी प्रभाग समिती सदस्य नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या होत्या, नंतर हा प्रस्ताव बारगळला. परंतु आता पुन्हा या विषयावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेच्या नगरसचिव विभागाने सर्व विभागीय अधिकाºयांना पत्र पाठवले असून, जाहिरात प्रसिद्ध करून रीतसर नावे मागविण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच याबाबत कार्यवाही होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या सर्वच प्रभाग समित्यांवर कोणतेच विषय नसल्याने नगरसेवक संतप्त होत असून, तसे असेल तर प्रशासन सभाच कशाला बोलवते, असा प्रश्नही नगरसेवक करीत आहे. सातपूर येथील प्रभाग समितीच्या बैठकीत तर नगरसेवकांनी बहिष्कार टाकण्याचीदेखील चर्चा करण्यात आली. प्रभाग समित्यांना अधिकार नसल्याने बैठकीत घंटागाडी, कचरा आणि तत्सम विषयांवर केवळ निष्फळ चर्चा होते. समित्यांचे महत्त्वच संपुष्टात आल्याने सध्या समिती सदस्यच त्रस्त आहे. त्यात आणखी सदस्य काय काम करणार, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक