नाशिक शहरात ध्वनी प्रदुषाचा दणदणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:58 IST2018-08-17T18:54:27+5:302018-08-17T18:58:00+5:30
नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नाशिक शहरात ध्वनी प्रदुषाचा दणदणाट
नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहराच्या विविध भागात पर्यावरण विषयक चाचण्या घेतल्या जातात. तसेच ध्वनी आणि वायु प्रदुषणाचे मापन केले जाते. सदरचा अहवाल पुढिल वर्षीच्या जुन महिन्याच्या आत महासभेवर ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार गेल्यावर्षीही एका खासगी एजन्सीमार्फत शहराच्या विविध भागात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार शहराच्या अनेक भागात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यात शहरात अत्यंत गजबजेल्या आणि वाहनांची गर्दी तसेच वाहतूक कोंडी असलेल्या भागात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले असून त्यात व्दारका चौफुली, पंचवटी तसेच सीबीएस याठिकाणी दिवसा ५५ ते ६५ डेसीबल ध्वनीमर्यादा असताना प्रत्यक्षात मात्र तेथे ७० डेसीबल पेक्षा अधिक डेसीबल आवाज होत असल्याने सर्वेक्षणात आढळले आहे.
महापालिकेच्या दरवर्षीच्या या प्रदुषण तपासणी अहवालांनतर महापालिकेने दरवर्षी प्रमाणे शहरात १९ शांतता क्षेत्र करण्यात आले आहेत. रस्ता रूंदीकरण करून वाहन कोंडी फोडली जात आहे, अशाप्रकारची दरवर्षीच्याच उपाययोजना कथन केल्या आहेत. पर्यावण हा शहराच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा विषय असताना त्यावर महासभेत एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही की जाब विचारलेला नाही.