सायकल शेअरींग वाचवण्यासाठी महिन्यातून एकदा नो व्हेईकल डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 19:37 IST2019-12-27T19:34:48+5:302019-12-27T19:37:06+5:30
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्यानंतर कंपनीने हा प्रकल्प कायम राहावा यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने मदत करण्याची तयारी दर्शविली असून नागरींकमध्ये सायकलीचा प्रचार प्रसार वाढवा आणि नुकसान न करता सायकलींचा वापर करावा यासाठी महिन्यातून एकदा नो व्हेईकल डे तसेच सायकलॉथॉन सारखे उपक्रम राबविण्यासाठीं सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तुर्तास सायकलींंगचा प्रकल्प आवरण्याच्या निर्णयास कंपनी आवर घालण्याची शक्यता आहे.

सायकल शेअरींग वाचवण्यासाठी महिन्यातून एकदा नो व्हेईकल डे!
नाशिक-स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्यानंतर कंपनीने हा प्रकल्प कायम राहावा यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने मदत करण्याची तयारी दर्शविली असून नागरींकमध्ये सायकलीचा प्रचार प्रसार वाढवा आणि नुकसान न करता सायकलींचा वापर करावा यासाठी महिन्यातून एकदा नो व्हेईकल डे तसेच सायकलॉथॉन सारखे उपक्रम राबविण्यासाठीं सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तुर्तास सायकलींंगचा प्रकल्प आवरण्याच्या निर्णयास कंपनी आवर घालण्याची शक्यता आहे.
शहरे स्मार्ट असावीत आणि पर्यावरण स्रेही वाहतूक व्यवस्था असावी यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने पब्लीक बायसिकल शेअरींग प्रकल्प राबविला आहे. खासगीकरणातून हिरो युआॅन या कंपनीने ही सेवा सुरू केली असून त्या अंतर्गत शहरात शंभर ठिकाणी डॉकींग स्टेशन उभारले असून एक हजार सायकली असून त्या नागरीकांना नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्धा तास सायकल मोफत आणि त्यांनतर पुढिल अर्ध्या तासासाठी अवघे पाच रूपये आकारले जात असल्याने नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यापूर्वी पर्यंत सुमारे सातशे सायकलींचा रोज वापर होत होता. मात्र, त्यानंतर प्रतिसाद घटत गेला. आता तर अवघ्या दोनशे सायकलीच चालविल्या जात असल्याने ठेकेदार कंपनीने हा प्रकल्प गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, सायकलींचा वापर पुन्हा वापर वाढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने प्रयत्न सुरू केले असून आज कंपनीच्या कार्यलयात नाशिक सायकलीस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, किरण चव्हाण, रत्नाकर आहेर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.