पर्वणी काळातील ‘नो व्हेइकल,
By Admin | Updated: July 27, 2015 00:44 IST2015-07-27T00:36:04+5:302015-07-27T00:44:11+5:30
नो एन्ट्री पॉइंट’ जाहीरपोलिसांचे नियोजन : वाहनांसह नागरिकांसाठी संचारबंदी

पर्वणी काळातील ‘नो व्हेइकल,
नाशिक : सिंहस्थ पर्वणी काळातील शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करून त्याठिकाणी नो व्हेइकल व नो एंट्री पॉइंट पोलीस प्रशासनाने जाहीर केले असून पर्वणीच्या आदल्या दिवसापासूनच याची अंमलबजावणी केली जाणार आहे़ पर्वणीच्या दिवशी मूळ नाशिकमधील रहिवाशांनादेखील आपली वाहने रस्त्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी लावावी लागणार असल्यामुळे वाहनांसाठी ही संचारबंदी तर स्थानिक नागरिकांची अक्षरश: कोंडी होणार आहे़
पोलीस प्रशासनाने अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, कन्नमवार पूल, तपोवन क्रॉसिंग, संतोष हॉटेल टी पॉइंट, काट्या मारुती चौक, सेवा कुंज, निमाणी बस स्टॅण्ड, दिंडोरी नाका, मखमलाबाद नाका, चिंचबन, रामवाडी बायजाबाई छावणी, रामवाडी पूल, रुंगटा हायस्कूल हा परिसर नो व्हेइकल झोन म्हणून जाहीर केला आहे़ या यादीनुसार स्थानिक नागरिकांची अक्षरश: कोंडी होणार असून स्वत:चे वाहनदेखील स्वत:च्या घरासमोर पार्क करणे अशक्य होणार आहे़ तसेच बाहेरची वाहने किंवा रिक्षादेखील गावात जाऊ शकणार नाही़
याकाळात स्थानिकांनी आपली वाहने बंद ठेवायची आहेत़ कारण विविध ठिकाणांहून नाशिकच्या मध्यवस्तीत वाहने घुसवू नयेत, म्हणून पोलिसांनी ‘नो एंट्री पॉइंट’देखील घोषित केले आहेत़ त्यामध्ये ज्योती बुक डेपो ते अशोकस्तंभ रोड, बालगणेश उद्यान रस्ता, पंडित कॉलनीतील लेन नंबर १ ते ५, टिळकवाडी चौक (पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता), कैलास सलून बोळ, रामायण बंगल्यासमोरील बोळ, धन्वंतरी हॉस्पिटलकडे जाणारा रोड, अरिहंत फ्रुट्स स्टोअर्स रोड, जलतरण सिग्नल, गोल्फ क्लबमागील रोड, चांडक सर्कल ते सुयश हॉस्पिटलकडे जाणारा रोड, एसएसके सॉलिटीअर हॉटेलसमोरील रोड, गोविंदनगरकडून येणारा नासर्डी पूल, मुंबई नाका भाभानगरकडे जाणारा रस्ता, तुलसी आय हॉस्पिटल नासर्डी पूल, पुणे रोड समाजकल्याण भवनसमोर (संपूर्ण महामार्ग), मिर्ची ढाबा ते पाटाला मिळणारा रस्ता, नाशिक डावा तट कालवा व एनएच ३ पर्यंतच्या दोन्ही बाजू, मीनाताई ठाकरे मैदान पाटाचे दोन्ही बाजूस, विजयनगरकडे जाणारा छोटा पूल, हिरावाडी पूल, मखमलाबाद पाटाचा रस्ता, कुमावतनगर पेठ फाट्याकडे जाणारा रोड, चंद्रमा मॅटर्निटी हॉस्पिटल, सुदर्शन कॉलनी, मधुबन कॉलनी मखमलाबाद नाक्याकडे जाणारा रोड, खंडेराव मंदिराकडून जाणारा रोड, साईबाबा सुपर मार्केटजवळील रोड (बायजाबाईच्या छावणीकडे), राका लॉन्स, पंचम स्वीट्स (शिवसाई फे्रंड सर्कल) रामवाडीकडे जाणारा रस्ता अशा ४० पॉइंट्सची निवड करण्यात आली आहे़ पोलिसांनी निवडलेले नो व्हेइकल व नो एंट्री पॉइंटची कडक अंमलबजावणी केल्यास बाहेरची वाहने तर सोडाच स्थानिक नागरिकांनाही सुमारे दोन ते पाच किलोमीटरची पायपीट करून व्यवहार करावे लागणार आहेत़