शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सडक्या कांद्याला बाजार समितीत नो एंट्री

By admin | Updated: August 26, 2016 01:01 IST

सडक्या कांद्याला बाजार समितीत नो एंट्री

सरकारवर दबावासाठी पाच पैसे दर : जाणकारांचे मतनाशिक : खाण्याजोगा नसलेला व फेकून देण्याच्याच योग्य असलेला कांदा बाजार समितीत विक्रीस आणणारा शेतकरी व अशा कांद्याचा पाच रुपये क्विंटल दराने लिलाव घेणाऱ्या व्यापाऱ्यामुळे बाजार समिती व शासन अशा दोहोंच्या बाबतीत नकारात्मक संदेश जात असल्याने शेतकऱ्यांनी आणलेल्या सडक्या कांद्याच्या लिलावात व्यापाऱ्यांनी सहभागी न होण्याचा तसेच शेतकऱ्यांनीही अशा कांद्याला बाजार समितीत न आणण्याचा निर्णय सायखेडा बाजार समितीने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी सायखेडा बाजार समितीत लिलाव झालेला कांदा सडका व खराब होता. त्यामुळे त्याला त्याच्या योग्य भाव देण्यात आला, त्याचवेळी अन्य शेतकऱ्यांच्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये इतका भाव देण्यात आला, परंतु माध्यमांमध्ये पाच पैसे किलोने कांद्याला भाव मिळाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या आवकेवर झाला.त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्येही नकारात्मक संदेश गेल्याने ते व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी अशा दोन्ही घटकांसाठी मारक असल्याची भावना सायखेडा बाजार समितीच्या संचालकांनी व्यक्त केली. त्याचाच आधार घेत, यापुढे सडक्या कांद्याला बाजार समितीत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरचा प्रकार म्हणजे कांद्याच्या विषयावर राजकारण तापविण्याचाच भाग असल्याचा अर्थ त्यातून काढण्यात येत असून, या घटनेनंतर तातडीने राज्य सरकारने पणन सचिवांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत माहिती सादर करण्याची सूचना केली तर सरकारमध्ये सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हमी भाव देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने आंदोलन करून अडीच हजार रुपयांची मागणी केली असून, शिवसेना नेते व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दीड हजार रुपये दराची मागणी केली. या साऱ्या बाबी शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शासनावर दबाव वाढविण्यासाठीच सडका कांद्याला बाजार समितीत आणले गेले व व्यापाऱ्यांनीही त्याचा लिलाव घेतल्याचे बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्याच्या कांद्याला पाच पैसे भाव मिळाला, तो कांदा फेकून देण्यायोग्यच होता, एरव्ही सडलेला कांदादेखील खत म्हणून वापरला जातो व त्याला दीडशे ते दोनशे रुपये दर मिळतो, असेही जाणकारांनी सांगितले.