शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:55 IST

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या 15 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला.

नाशिक - नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या 15 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यासह सदस्यांनी 31 ऑगस्टच्या आत विशेष महासभा बोलवण्याच्या मागणीसाठी नगरसचिवांनी पत्र दिले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे प्रचंड मनमानी करत असून ही हुकूमशाही असल्याचे मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केले आहे. ''आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहारावर मोठ्या प्रमाणात करवाढ लादली आहे. नगरसेवक कोणत्याही प्रकारची कामे करू शकत नाही'', अशी तक्रार करण्यात आली आहे. येत्या ३१ आॅगस्टच्या आत विशेष महासभेची मागणी त्यात करण्यात आली होती तथापि, महापौरांनी येत्या शनिवारी (दि.१) विशेष महासभा बोलावली असून मुंढे यांच्या कारकिर्दीचा फैसला येत्या शुक्रवारच्या आत होणार आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी करीत असून त्यांच्या हुकूमशाही कारभाराने नागरीक वेठीस धरले जात असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. स्थायी सतिीच्या सर्व पक्षीय सदस्यांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या असून पक्ष प्रमुखांच्या वेगवेगळ्या भूमिकांनी वातावरण ढवळून निघाले आहे.

मनसे आणि शिवसेनेने आयुक्त तुकारा मुंढे यांनी जनतेवर लादलेली करवाढ रद्द करावी अशी मागणी केली असून तसे केल्यास ठरावास सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका घेतली आहे तर राष्टवादी कॉँग्रेसचे माजी खासदार समीर भूजबळ यांनी भाजपा अविश्वास ठरावाच्या माध्मयातून जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका केल्याने त्यांचा या ठरावाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट झाले आहे.

दिनकर पाटील यांच्या शीर्षपत्रावर नगरसचिवांना सोमवारी (दि.२७) देण्यात आलेल्या पत्रात तुकाराम मुंढे यांच्यावर ओनक आरोप करण्यात आले असून पदाधिकारी आणि सन्मानीय सदस्यांचा अवमान करणे, महासभा व स्थायी समितीच्या अधिकारावर गदा आणणे याबरोबरच नागरी सुविधांबाबत अकार्यक्षमता, हेकेखोर, मनमानी पध्दतीने काम करणे व हुकूमशाही पध्दतीने काम करणे, स्थायी समितीस गैरहजर राहणे आणि मुख्यत्वे म्हणजे करवाढ सरकट रद्द करण्याचा महासभेचा ठराव करण्यात आलेला असतानाही त्याची दखल न घेणे अशाप्रकारचे आरोप करण्यात आले असून विशेष महासभेची मागणी केली आहे. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असतानाही तुकाराम मुंढे यांना तेथील महापौरांसह नगरसेवकांचा विरोध पत्करावा लागत होता. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMaharashtraमहाराष्ट्रtukaram mundheतुकाराम मुंढे