शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका नेमणार ‘स्वच्छतादूत’

By admin | Updated: December 22, 2015 00:07 IST

स्वच्छ भारत अभियान : कविता राऊतसह अनेक नावे चर्चेत

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत जनमानसात स्वच्छतेविषयीचा जागर होण्यासाठी आणि लोकांपर्यंत शासनाच्या योजना नेऊन पोहोचविण्यासाठी महापालिका ‘स्वच्छतादूत’ (ब्रॅण्ड अम्बॅसेडर) नेमणार असून, आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतसह अनेक मान्यवरांची नावे चर्चेत आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेकडून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येणार आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे काम नुकतेच सुरू केले आहे. शिवाय, परिसर स्वच्छतेसंबंधी जनमानसात व्यापक स्तरावर जागृतीही केली जाणार आहे. महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी ‘स्वच्छतादूत’ नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नामवंत कलावंत, खेळाडू तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधून त्यांची सहमती मिळविली आहे. त्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारे चित्रकार, कलावंत आदिंचा समावेश असून, अनेक नावांची शिफारस येत्या महासभेवर करण्यात येणार आहे. त्यातील अंतिम नावांवर महासभा शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर हा एकच असला पाहिजे यावर महासभेचे एकमत होण्याची शक्यता असून, कविता राऊत यांच्याच नावावर सहमती होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.