रत्नगडावर चोरांचा दानपेटीवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:43 IST2018-08-31T00:42:41+5:302018-08-31T00:43:02+5:30
दिंडोरी : तालुक्याची प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या रत्नगडावर काल रात्रीच्या सुमारास चोरांनी दानपेटी तोडुन दानपेटीतील रोख रक्कम लुटुन नेली आहे.

रत्नगडावर चोरांचा दानपेटीवर डल्ला
दिंडोरी : तालुक्याची प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या रत्नगडावर काल रात्रीच्या सुमारास चोरांनी दानपेटी तोडुन दानपेटीतील रोख रक्कम लुटुन नेली आहे.
सकाळी आरती करण्यासाठी भाविक गडावर आले त्यांना मंदिरातील दरवाजा उघडा दिसला व मंदीरातील साहित्य अस्तावेस्त पडलेले दिसुन आले व दानपेटीची कुलुप तोडुन त्यातील रक्कम, ध्वनिषेपक यंत्र चोरी गेल्याचे लक्षात येताच भाविकांनी सरपंच वैशाली बस्ते, पोलिस पाटील व गावकर्Þयांना सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळा ची पाहणी करत पंचनामा केला यावेळी घटनेची फिर्याद प्रविण नामदेव बस्ते यांनी दिली. या घटनेचे चित्रीकरण गडावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्या नुसार पोलीस तपास सुरू झाला असून लवकरच चोर गजाआड होतील असे पोलीसांनी
सांगितले. सदर घटनेची तात्काळ चौकशी करून आरोपीना तात्काळ गजाआड करण्याची मागणी सरपंच वैशाली सोमनाथ बस्ते, पोलिस पाटील सुदाम गाडे आदिंनी केली आहे.