निफाडच्या तरु ण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:09 IST2018-11-26T01:08:50+5:302018-11-26T01:09:09+5:30
कर्जाला कंटाळून येथील विठ्ठल लहानू जाधव (३५) या तरुण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्याच्यावर २७ लाखांचे कर्ज होते.

निफाडच्या तरु ण शेतकऱ्याची आत्महत्या
निफाड : कर्जाला कंटाळून येथील विठ्ठल लहानू जाधव (३५) या तरुण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्याच्यावर २७ लाखांचे कर्ज होते. विठ्ठल जाधव यांनी दि. १० नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना दि. २५ रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. आत्महत्या करण्यापूर्वी जाधव यांनी लिहिलेली चिठ्ठी नातेवाइकांना आढळून आली आहे. त्यात आपल्यावर २७ लाख रुपयांचे कर्ज असल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.