निफाडला जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:37 IST2021-04-20T23:05:55+5:302021-04-21T00:37:12+5:30

निफाड : शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या स्वरूपात वाढत असल्याने मंगळवारपासून (दि. २०) जनता कर्फ्यू पाळण्यास सुरुवात झाली. या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यू २ मेपर्यंत पाळण्यात येणार आहे.

Niphadla suffers from public curfew | निफाडला जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

निफाडला जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

ठळक मुद्देनागरिक घरात असल्याने शहरात शुकशुकाट जाणवला.

निफाड : शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या स्वरूपात वाढत असल्याने मंगळवारपासून (दि. २०) जनता कर्फ्यू पाळण्यास सुरुवात झाली. या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यू २ मेपर्यंत पाळण्यात येणार आहे.

शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी यांची बैठक सोमवारी (दि. १९) घेण्यात आली या बैठकीत मंगळवार दि. २० एप्रिल ते २ मे या कालावधीत शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवण्यात आले. या कालावधीत फक्त मेडिकल, दवाखाने, हॉस्पिटल, पिठाच्या गिरण्या या अत्यावश्यक सेवा चालू राहतील. उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान दूध विक्री करता येणार आहे. मंगळवारी दिवसभर फक्त मेडिकल, दवाखाने, हॉस्पिटल पिठाच्या गिरण्या या अत्यावश्यक सेवा चालू होत्या. उर्वरित सर्व दुकाने बंद होती. नागरिक घरात असल्याने शहरात शुकशुकाट जाणवला. रस्त्यावर कमी वर्दळ होती. हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्व पक्ष, संघटना, व्यापारी, नागरिक यांचे सहकार्य चांगले लाभले.
फोटो - २० निफाड जनता कर्फ्यू

निफाड येथील निफाड-पिंपळगाव बसवंत रोडवर बंद असलेली दुकाने.

Web Title: Niphadla suffers from public curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.