निफाडला दत्त जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:30 IST2020-12-29T17:28:27+5:302020-12-29T17:30:00+5:30
निफाड : अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरू दत्तात्रयांची जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली.

निफाडला दत्त जयंती साजरी
निफाड : अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरू दत्तात्रयांची जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली.
सप्ताहात प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रात गुरीचारित्र पारायण झाले. उर्वरित सेवेकऱ्यांनी घरीच पारायण सेवा केली. श्री दत्तजयंती निमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्रात दुपारी १२.३९ वाजता श्री गुरुचरित्र ग्रंथातील दत्त जन्माचा अध्याय वाचून मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर सामुदायिक महानैवैद्य आरती झाली.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मार्गदर्शक वि. दा. व्यवहारे यांनी .सेवेकरी, भाविकांना श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व दत्तात्रय या विषयी मार्गदर्शन केले. शहरातील शिंपी गल्ली येथील दत्त मंदिर, माणकेश्वर चौकातील गोसावी वाड्यातही पारंपरिक पद्धतीने व मंगलमय वातावरणात कार्यक्रम झाले.