निफाडला कॉँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:33 IST2020-07-03T22:00:57+5:302020-07-04T00:33:39+5:30

इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्र वारी (दि.३) निफाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

Niphadla Congress agitation | निफाडला कॉँग्रेसचे आंदोलन

निफाडला कॉँग्रेसचे आंदोलन

निफाड : इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्र वारी (दि.३) निफाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात दिगंबर गिते, निफाड तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष मधुकर शेलार, ज्येष्ठ नेत्या निर्मला खर्डे, विनायक शिंदे, राजेंद्र बागडे, माधव निचित, सचिन होळकर, संपत कराड, भय्या देशमुख, सुनील निकाळे, सचिन खडताळे, सुहास सुरळीकर, राजेश लोखंडे, पुंजा तासकर, सुधाकर मोगल, नितीन बनसोडे, आतिष गायकवाड, भय्या मणियार आदी सहभागी झाले होते. यावेळी निफाडच्या प्रांत अर्चना पठारे व निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. नागरिक आर्थिक विवंचनेत असताना पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

Web Title: Niphadla Congress agitation