शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

निफाडला भाजपाचा सेनेला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:48 AM

नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना प्रत्येकी एक समिती मिळाली. या नव्या आघाडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारण ढवळून निघाले आहे.

निफाड : नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना प्रत्येकी एक समिती मिळाली. या नव्या आघाडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारण ढवळून निघाले आहे.विषय समिती सदस्य व सभापती पदाच्या निवडणुकीसाठी निफाडचे प्रभारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यांना नगरपंचायतचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण यांनी साहाय्य केले. विषय समितीच्या एकूण चारपैकी तीन समित्यांच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी एकेक नामनिर्देशनपत्र  दाखल झाल्याने समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली.भाजपाच्या स्वाती गाजरे या शिक्षण, आरोग्य, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापतिपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त कापसे यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. काँग्रेस आय पक्षाच्या नयना निकाळे या बांधकाम समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवडून आल्या. भाजपाच्या उपनगराध्यक्ष मंगला शंकरराव वाघ या नियोजन समितीच्या पदसिद्ध सभापती आहेत. या निवड प्रक्रियेप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्ष मंगल वाघ, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, देवदत्त कापसे, आनंद बिवलकर, किरण कापसे,जावेद शेख, एकनाथ तळवाडे, चारुशीला कर्डिले, लक्ष्मी पवार, अलका पवार, सुनीता कुंदे, नयना निकाळे, शिरीन मणियार, नूरजहाँ पठाण, स्वीकृत नगरसेवक दिलीप कापसे, संदीप जेऊघाले उपस्थित होते.  १ नोव्हेम्बर २०१५ रोजी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजप सेनेने विजय मिळवल्याने या युतीने कॉग्रेस, बसपा यांना एकत्रित करीत १७ पैकी १३ नगरसेवकांचे बहुमत करीत सत्ता मिळवली होती निफाड नगरपंचायतीवर शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे .

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षnifadनिफाड