निफाड तालुका नाभिक युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:07+5:302021-08-28T04:18:07+5:30

लासलगाव : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली नाभिक युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत सेना मंदिरात ...

Niphad Taluka Nabhik Yuva Sena executive announced | निफाड तालुका नाभिक युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर

निफाड तालुका नाभिक युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर

लासलगाव : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली नाभिक युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत सेना मंदिरात नुकतीच झाली. यावेळी निफाड तालुका नाभिक युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नाभिक युवा सेनेची बैठक तालुका अध्यक्ष डॉ प्रकाश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीत निफाड तालुका नाभिक युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सरचिटणीसपदी तुषार जगताप यांची तर संघटकपदी रवींद्र वाघ, अविनाश देसाई यांची व प्रसिद्धी प्रमुख म्हणून नीलेश देसाई, प्रमोद सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना समाज संघटन बळकट करण्यासाठी युवकांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला संतसेना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद देसाई, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष उषा मोटेगावकर, विलास सूर्यवंशी, अरुण कडवे, संजय बोरसे, सुनील जाधव, विष्णू कणसे, अशोक जगताप, मगन औटे, लक्ष्मण जाधव, रमेश वाघ, नितीन वाघ, महेश वाघ, संदीप कदम, रवींद्र वाघ, मयूर देसाई, विजय वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वाघ यांनी केले तर आभार रूपाली वाघ यांनी मानले.

फोटो- २६ लासलगाव नाभिक

लासलगाव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपस्थित नाभिक समाजाचे पदाधिकारी.

260821\050526nsk_33_26082021_13.jpg

फोटो- २६ लासलगाव नाभिक लासलगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपस्थित नाभिक समाजाचे पदाधिकारी. 

Web Title: Niphad Taluka Nabhik Yuva Sena executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.