निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी "ते" ठरताहेत आरोग्यदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:09 PM2021-04-17T18:09:19+5:302021-04-17T18:11:08+5:30

सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण काळात गोदाकाठ भागातील डॉ. प्रल्हाद डेर्ले हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत.

In Niphad taluka, health envoys are becoming a hotbed for corona patients | निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी "ते" ठरताहेत आरोग्यदूत

हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्ण उपचारासाठी येतात. पण सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जास्तीत जास्त वेळ देऊन उपचार करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करताना डॉ. प्रल्हाद डेर्ले.

Next
ठळक मुद्देवर्षभरात एकही दिवस सुट्टी न घेणारा अवलिया : दररोज १०० रुग्णांवर उपचार

सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण काळात गोदाकाठ भागातील डॉ. प्रल्हाद डेर्ले हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत.
चांदोरी येथे डॉ. डेर्ले हे दिवसभरात किमान १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करीत आहेत. स्कोर कमी असलेल्या रुग्णाला घरीच टेलिमेडिसिन देऊन उपचार करण्यासाठी पाठवून देतात. मात्र, घरी गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे, किमान वीस दिवस कोणाच्या संपर्कात येऊ नये, असा नियम ते घालून देतात. उपचार करत असताना रुग्णामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी रुग्णाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधतात. एकदा कोरोना रोगाची भीती मनातून गेली की रुग्ण अर्धे बरे होतात. चांगला आहार, जास्त फळे खाणे, जास्त पाणी पिणे, कोरोना संदर्भात बातम्या न पहाणे, मोबाईलपासून दूर रहाणे, वेळेवर दिलेली औषधे घेणे असा मार्मिक सल्ला देऊन रुग्णाला सकारात्मक ऊर्जा देतात.

जिल्ह्यात कुठेही फिरले तरी सहजासहजी बेड मिळत नाही. व्हेंटिलेटर हवे असलेल्या बेडसाठी नातलगांना मोठी धावपळ करावी लागत आहे. बेड मिळाले नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही यामुळे अनेक रुग्ण जगाचा कायमचा निरोप घेत आहेत. अशा प्रसंगात डॉ. डेर्ले निफाड तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना मेडिसिन देऊन ठणठणीत बरे करीत असल्याने ते प्रसंगात देवदूत ठरत आहे


कोरोनाची दुसरी लाट ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. आज एका एका गावात सुप्त पॉझिटिव्ह रुग्ण संख्या भरपूर आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. शेवटी मर्यादा येतात. मात्र स्कोर कमी असलेल्या रुग्णांना टेलिमेडिसिन देऊन घरीच उपचार करीत आहे. मात्, या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी यासह उत्तम आहार, योग्य व्यायाम, वेळेवर औषध घेण्यासाठी सूचना देऊन रुग्णामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. वेळेत उपचार आणि न घाबरणारे रुग्ण थोड्या दिवसांत ठणठणीत बरे होतात.
- डॉ प्रल्हाद डेर्ले, चांदोरी

 

 

Web Title: In Niphad taluka, health envoys are becoming a hotbed for corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.