निफाडचा पारा १० अंशांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 01:10 PM2019-12-19T13:10:34+5:302019-12-19T13:11:04+5:30

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे.

 Niphad mercury at 4 degrees! | निफाडचा पारा १० अंशांवर !

निफाडचा पारा १० अंशांवर !

googlenewsNext

सायखेडा: निफाड तालुक्यातील थंडीचे वाढते प्रमाण आणि पहाटे पसरलेली धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वरच्या थंडीची अनुभूती तालुक्यात येत आहे. निफाडचा पारा १० अंशांवर आला आहे.राज्यात सर्वात थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. हिवाळ्यातील थंडी अनुभवायची असल्यास हिवाळा ऋतूत एकदातरी महाबळेश्वरची सहल करावी आणि थंडीची मजा लुटावी अस म्हटलं जातं, मात्र हा अनुभव आता निफाड तालुक्यात येत आहे. दिवस लहान होत असल्याने सायंकाळी सहा वाजता अंधार पडतो. सात वाजता खेड्यातील घरांपुढे शेकोटी पेटवल्या जातात. लहान मुले, माणसे, वृद्ध माणसे रात्रि उशीरपर्यंत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीची आश्रय घेत आहे. निफाड तालुक्यात गोदावरी ,कादवा, बाणगंगा , विनिता, नदीचे खोरे आहे, काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, ऊसाचे शेती, द्राक्षाचे मळे, नगदी पिकांची शेती असा सुजलाम सुफलाम असलेला भौगोलिक परिसर आण िनांदूरमध्यमेश्वर धरनाचा पाणथळ ,दलदलीचा प्रदेश यामुळे मोठ्या प्रमाणावर थंडी असते ,
मागील दोन वर्षे सातत्याने ० अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. हिमकन आणि गोठलेले पाणी, पिकांच्या पानावर, ऊसाच्या पाचटावर, घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर अनेक वेळा हिमकन दिसले आहे ,यंदा जरी आध्याप तसा प्रकार दिसला नसला तरी , आठ दिवसांपासून सातत्याने थंडी वाढत असल्याने लवकरच तशी वेळ येईल असं जाणकार सांगत आहेत
वाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसतो, भुरी रोगाचा प्रादुर्भाव आण िमण्यांची थांबलेली फुगवण शेतकर्यांची डोकेदुखी ठरते
कांदा , गहू, हरबरा या पिकांना फायदेशीर असणारी थंडी द्राक्ष पिकाला मात्र मारक ठरते.
------------------------------
राज्यात सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण महाबलेश्वर असले तरी काही वर्षापासून निफाडचा घसरणारा पारा आणि वाढते थंडीचे प्रमाण यामुळे महाबळेश्वरचे गुड फिल निफाड तालुक्यात होत आहे. सायंकाळी सहा वाजता सुरु होणारी थंडी दिवसभर काही प्रमाणात सुरु असते. सद्या तालुक्यात कुल कुल वातावरण निर्माण झाले आहे.
-डॉ विजय डेर्ले, सायखेडा
---------------------------
थंडीच्या वाढत्या प्रमाणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे , इतर पिकांसाठी मात्र थंडी अनुकूल आहे, कांदा, गहू, हरबरा, ऊस या पिकांना थँडी फायदेशीर ठरत आहे. थंडीमुळे पिके जोमदार होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, द्राक्ष मात्र भुरी आणि मण्यांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम होत असतो
-वाळू जाधव, शेतकरी

Web Title:  Niphad mercury at 4 degrees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक