महागाई विरोधात निफाडला काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:57 IST2021-07-14T22:48:04+5:302021-07-15T00:57:37+5:30

निफाड : केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव, वाढत्या महागाईच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निफाड येथे बुधवारी (दि.१४) सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Niphad Congress cycle rally against inflation | महागाई विरोधात निफाडला काँग्रेसची सायकल रॅली

निफाडच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देतांना मधुकर शेलार, दिगंबर गीते, राजेंद्र मोगल, प्रकाश अडसरे, विनायक शिंदे, सचिन खडताळे, सुनील निकाळे, सुहास सुरळीकर, साहेबराव ढोमसे, भय्या देशमुख, राजेश लोखंडे, पुंजा तासकर आदी.

ठळक मुद्देआंदोलन : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम

निफाड : केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव, वाढत्या महागाईच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निफाड येथे बुधवारी (दि.१४) सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

सायकल रॅलीनंतर निफाडच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ,किराणा माल, यांच्या किमती भरमसाठ पद्धतीने वाढवल्याने सर्वसामान्य जनता महागाईने वैतागली आहे. पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्यावर गेले आहे. पेट्रोलचे भाव वाढवल्याने आधीपेक्षा पेट्रोल, डिझेल विक्रीत ३० ते ४० टक्के घसरण दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालक वैतागले आहेत. केंद्राने वाढवलेली महागाई कमी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, जि. प. चे माजी उपाध्यक्ष उपाध्यक्ष दिगंबर गीते, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अडसरे, जि. प. चे माजी सभापती राजेंद्र मोगल, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, भैय्या देशमुख, साहेबराव ढोमसे, युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन खडताळे, सुनील निकाळे, राजेश लोखंडे, पुंजा आप्पा तासकर, संपत कराड, सुरेश कापसे, सुहास सुरळीकर, राहुल नागरे, रघुनाथ कुंदे, नरेंद्र गीते, अन्वर शेख, नयना निकाळे, मधुसूदन आव्हाड, कैलास आव्हाड, सुरेश कुमावत, मीरान पठाण, बाबासाहेब सोमवंशी, शरीफ पठाण, नजीर शेख, असिफ पठाण, समीर मुलानी, कांतीलाल निकाळे, संतोष पठाडे, सुरज साळवे, दीपक आहेर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Niphad Congress cycle rally against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.