अरबाज खूनप्रकरणी नऊ संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:15 IST2019-01-16T13:10:50+5:302019-01-16T13:15:42+5:30

तत्काळ तपासाची चक्रे फिरविली गेली. हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांच्या पथकाने मल्हारखान झोपडपट्टी भागात रात्रीउशिरापर्यंत झडतीसत्र राबविले.

Nine suspects arrested in Arbaaz murder case | अरबाज खूनप्रकरणी नऊ संशयित अटकेत

अरबाज खूनप्रकरणी नऊ संशयित अटकेत

ठळक मुद्देयापाठीमागे दुसरी कोणती गुंड प्रवृत्ती आहे का? नऊ संशयितांपैकी कोणाचेही नाव अद्याप जाहीर केलेले नाही.मल्हारखान झोपडपट्टी परिसरातून ताब्यात

नाशिक : जुने नाशिक परिसरातील गंजमाळ पोलीस चौकीजवळ अज्ञात हल्लेखोरांच्या टोळक्याने अरबाज पठाण नावाच्या युवकावर सशस्त्र हल्ला चढवून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील हल्लेखोरांपैकी नऊ संशयितांना मल्हारखान झोपडपट्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, किरकोळ भांडणाची कुरापत काढत हल्लेखोरांनी अरबाजवर धारधार शस्त्रांनी हल्ला रात्रीच्या सुमारास केला. या हल्ल्यात अरबाज मृत्यूमुखी पडला. याप्रकरणी तत्काळ भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी पोलीस ठाणेप्रमुखांना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शोधमोहिमेच्या सुचना दिल्या. तसेच गुन्हे शाखा युनिट-१ला देखील याबाबत सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या. तत्काळ तपासाची चक्रे फिरविली गेली. हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांच्या पथकाने मल्हारखान झोपडपट्टी भागात रात्रीउशिरापर्यंत झडतीसत्र राबविले. या दरम्यान, परिसरातून अरबाज खून प्रकरणाशी संबंधित संशयितांची धरपकड करण्यात आली. नऊ संशयितांना अटक करण्यास पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत यश आले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सशस्त्र हल्ला का केला? यापाठीमागे दुसरी कोणती गुंड प्रवृत्ती आहे का? हल्ल्यामागील नेमके कारण काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे चौकशीतून पोलिसांकडून शोधली जात आहे. या हल्ल्याची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत, याची चाचपणी पोलीस करत आहेत. नऊ संशयितांपैकी कोणाचेही नाव अद्याप पोलिसांनी अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही.

Web Title: Nine suspects arrested in Arbaaz murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.