दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 09:21 PM2019-11-22T21:21:19+5:302019-11-22T21:25:27+5:30

शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४  विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  अशा निष्काळजीपणाचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असून, पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याच्या कालावधीत विनाकारण विभागीय शिक्षण मंडळाच्या फेºया घालाव्या लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 

Nine results were changed in the 10th reevaluation; १४४ Changes in points in case | दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल

दहावीच्या पुनर्मूल्यांकनात नऊ निकाल बदलले ; १४४ प्रकरणात गुणांत बदल

Next
ठळक मुद्देपुनर्मूल्यांकनात दहावीच्या पेपर तपासणीतील निष्काळजीपणा उघड नऊ निकाल बदलले ; १४४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

नाशिक  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४  विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत  आहे. अशा निष्काळजीपणाचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असून, पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याच्या कालावधीत विनाकारण विभागीय शिक्षण मंडळाच्या फेºया घालाव्या लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुण पडताळणीसाठी २४४ विद्यार्थ्यांनी तर , छायांकित प्रति मिळविण्यासाठी ८१५ व  पुनर्मूल्यांकानासाठी १९२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांचे निकाल बदलून ते उत्तीर्ण झाले. परंतु विद्यार्थ्यांना हे निकाल मिळविण्यासाठी जवळपास जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाच्या फेऱ्यात अडकलल्या विद्यार्थ्यांना अर्ज करताना कमी वेळ मिळाला होता, तर जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या बाबतीतही असाच प्रकार समोर आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर गुणपडताळणीसाठी २४, छायांकित प्रतिसांठी ४१ व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्राप्त झाले होते. यातील पुनर्मूल्यांकनात सहा प्रकरणांमध्ये गुणांमध्ये बदल झाला असून, एका निकालात बदल झाला, तर एक प्रकरण अजूनही प्रलंबित असून त्यावरील निकाल अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारे पेपर तपासणीत राहणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने पेपर तपासणीतील उणिवा दूर करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

Web Title: Nine results were changed in the 10th reevaluation; १४४ Changes in points in case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.