जिल्ह्यातील नऊ आमदारांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:13 AM2019-10-27T01:13:27+5:302019-10-27T01:14:08+5:30

विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून, जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदारांना मतदारांनी नाकारले आहे. त्यात नाशिक शहरातील बाळासाहेब सानप आणि योगेश घोलप यांचा समावेश आहे.

 Nine MLAs lost in district | जिल्ह्यातील नऊ आमदारांचा पराभव

जिल्ह्यातील नऊ आमदारांचा पराभव

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून, जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदारांना मतदारांनी नाकारले आहे. त्यात नाशिक शहरातील बाळासाहेब सानप आणि योगेश घोलप यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या निकालात नऊ आमदारांचे धक्कादायकरीत्या पराभव झाले आहेत. यात ऐनवेळी राष्टवादीत प्रवेश करणारे नाशिक पूर्वचे उमेदवार बाळासाहेब सानप, देवळाली मतदारसंघातील शिवसेनेचे योगेश घोलप, सिन्नरमधील शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, निफाडमधील सेनेचे आमदार अनिल कदम, नांदगावमधील राष्टÑवादीचे आमदार पंकज भुजबळ, कळवणमधील माकपा आमदार जिवा पांडू गावित, मालेगाव मध्यमधील काँग्रेसचे आमदार असिफ शेख, त्याचप्रमाणे निर्मला गावित आणि दीपिका चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर येवला मतदारसंघातील राष्टÑवादीचे आमदार छगन भुजबळ, राज्याच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, दिंडोरीचे नरहरी झिरवाळ, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, चांदवडचे डॉ. राहुल आहेर यांना पक्षाने पुन्हा संधी मिळाली आहे.

Web Title:  Nine MLAs lost in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.