यंदा नवरात्रोत्सवातील नऊ रंग पडणार फिके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:04 IST2020-10-08T19:30:43+5:302020-10-09T01:04:34+5:30
देवगाव : नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंग आणि एकाच रंगाच्या कपड्यात महिला-पुरु ष वावरतांना दिसतात. यासाठी गणेशोत्सव संपताच या नवरंगी कपड्यांच्या खरेदीसाठी लगबग बाजारात दिसून येते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांत रंगीबेरंगी कपड्यांच्या खरेदीसाठी शुकशुकाट दिसून येत आहे. त्यातही राज्य सरकारने नवरात्र उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन घालून दिले असल्याने तरु ण-तरु णींमध्ये उत्सवावर विरजण पडणार आहे. तर कार्यालयांमध्येही ठराविक कर्मचार्यांची उपस्थित असल्याने यंदा नऊ दिवसांच्या नऊ रंगाचा रंग फिका पडणार असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे यंदा राज्यात विविधन सण-उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. धार्मिक स्थळे सुरू करणे व धार्मिक कार्यक्र मांना एकत्र येण्यावर अजूनही निर्बंध कायम असल्याने यंदा राज्यात प्रथमच नवरात्रोत्सवात दांडिया- गरबाचे आयोजन करता येणार नसल्याने तरु णाईचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रीत घटस्थापनेच्या तयारी बरोबर दांडिया गरबासोबत नागरिकांना नऊ रंगचेही आकर्षक असते. सर्वांमध्ये एकोपा, समानता यावी यासाठी गेल्या रंगांचा ट्रेंड सुरू झाला आणि युवावर्गाने दरवर्षी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा पाडली. एखाद्या रंगांचा पोशाख त्यांच्याकडे नसेल तर आवर्जून या दिवसांत त्याची खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारांतही या दिवसांत महिला-पुरु षांची मोठ्या प्रमाणावर लगबग दिसून येते. मात्र, यंदा कोरोनामुळे कोणी कोणाला भेट नाही. तसेच बस बंद कार्यालयातही मोजचेक कर्मचारी यामुळे यंदा नऊ रंगांचा रंग फिका पडणार आहे.
यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे विविध धार्मिक सण, कार्यक्र मांवर मर्यादा आल्या आहेत. परंतु तरु णाईने गांभीर्याने कोरोनाकडे दुर्लक्ष न करता सामाजिक अंतर ठेवून, चेहर्यावर मास्क परिधान करून आपापले सण शासनाच्या नियमाच्या अधीन राहून साजरे करण्यावर भर देणार आहे.
- दीपक दोंदे, देवगाव